विक्री करिता घेवुन जात असलेले गोमांस सालेकसा पोलीसांकडून जप्त…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

🔹याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस  निरीक्षक श्री. बाबासाहेब बोरसे, ठाणेदार सालेकसा यांना मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहीतीच्या आधारे दिनांक 07/10/2023 रोजी  सालेकसा येथील पोलीस पथकाने सालेकसा हद्दीत  छापा टाकून कारवाई केली असता एक पांढऱ्या रंगाची इरटीगा चारचाकी वाहन क्र. एम एच 46 एक्स 7541 आमगांव कडुन दर्रेकसा च्या दिशेने येतांना दिसले. सदर वाहन पोलीस पथकाचे मदतीने थांबविण्यात आले असता त्यात दोन इसम दिसून आलेत.सदर दोन्ही ईसम व वाहनाची तपासनी केली असता वाहनाचे मागील बाजूचे शिटवर 15 मोठे थैले ठेवले होते. सदर थैल्यांची पंचासमक्ष पाहनी केली असता त्यामध्ये गोमांश असल्याचे दिसुन आले. सदर थैल्यामध्ये अंदाजे प्रत्येकी 30 किलो ग्रॅम प्रमाणे एकुण 450 किलोग्रॅम किंमती प्रति किलो 150/- रु. प्रमाणे 67,500/- रु. गोमांस मिळुन आला. गोमांस बाबत विचारपुस केली असता त्यांनी डोंगरगढ येथे विक्री करिता इरटीगा चारचाकी वाहनात नेत असुन त्याबाबत त्यांचे कुठलेही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले. सदर थैल्यामध्ये असलेला अंदाजे एकुण 450. किलो ग्रॅम प्रति किलो 150/- रु. प्रमाणे किंमती अंदाजे 67,500/- रु. चा गोमांस सदृश्य मांस व एक पांढऱ्या रंगाची इरटींगा चारचाकी वाहन क्र. एम एच 46 एक्स 7541 किंमती अंदाजे- 5,90,000/- रु. असा एकुण 6,57,500/- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने दोन्ही आरोपीतां विरुध्द पो.स्टे. ला अप क्र. 367/2023 कलम 5, 5 (सी), 9, 9 (ए) महा. प्रा. रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयात दोन्ही आरोपीतांना अटक करण्यात आले असुन दोन्ही आरोपीतांना मा. न्यायालय आमगांव येथे पेश केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचे तपास सपोनि अरविंद राऊत पो.स्टे. सालेकसा हे करित आहेत.

         वरील कामगिरी मा. श्री. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे सा., श्री. मा. अशोक बनकर अप्पर पोलीस अधिक्षक सा. गोंदिया कॅम्प देवरी, श्री. संकेत देवळेकर, उप-विभागिय पोलीस अधिकारी देवरी, श्री. किशोर पर्वते, प्रभारी उप-विभागिय पोलीस अधिकारी, आमगांव यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाबासाहेब बोरसे (ठाणेदार), पोउपनि अजय पाटील, पो.ना. रितेश अग्नीहोत्री, पोशि इंगळे , वेदक, कटरे, गोसावी, पो.स्टे. सालेकसा यांनी सदरची कार्यवाही पार पाडली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट