सलग दुस -यादा रायगड पोलीस दलास सर्वोत्कृष्ट पोलीस घटक (Best Police Unit) किताब प्राप्त..
उपसंपादक- रणजित मस्के
रायगड: राज्यातील पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या मर्यादे मध्ये उत्कृष्ट पदधतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयाचा तपास, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहीत करणे याकरीता मा.पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून पोलीस घटकांना “सवोत्कृ ष्ट पोलीस घटक” प्रदान करण्यात येतात.


जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीकरीता सवोत्कृष्ट पोलीस घटकाच्या झालेल्या निवड प्रक्रियेमध्ये रायगड जिल्हा पोलीस दलाने “सर्वोत्कृष्ट पोलीस घटक” (Best Police Unit) म्हणुन राज्यांमध्ये दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
सवोत्कृष्ट पोलीस घटकाच्या निवड प्रक्रियेमध्ये राज्यातील पोलीस घटकाांची गुन्हे व प्रशासकीय बाबीांवर पडताळणी करण्यासाठी मुल्याांकन समित्या तयार केल्या जातात व त्याांच्याकडुन सर्वोत्कृष्ट पोलीस घटकाची निवड केली जाते.

सवोत्कृष्ट पोलीस घटक निवडीकरीता असणा-या मापदंडामध्ये
1) गुन्हे तपास
2)गुन्हे निरगती
3) दारूबांदी/जुगार कारवाई
4)सायबर गुन्हे
5)पाहिजे व फरार आरोपी अटक
6)दुर्बल घटकांविरुदधच्या गुन्ह्यांची निरगती
7)मिळुन न आलेले / हरवलेली व्यक्ती
8)महिलांच्या संबंधित दाखल गुन्हयाचा तपास व काल मर्यादेत निरगती
9)समन्स वॉरंट बजावणी
10)दोषसिदधी
11)रस्ते अपघात व मृत्यू दर
12)मुद्देमाल निरगती
13)प्रलंबित पासपोर्ट पडताळणी
14)श्वान व अंगुलमुदरा पथक इत्यादीं बाबींचा तसेच इतर प्रशासकीय बाबी यांचा समावेश असतो.
तसेच यापुवीही जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीकरीता रायगड जिल्हा पोलीस दलाची “सर्वोत्कृष्ट पोलीस घटक” म्हणुन निवड झालेली होती. रायगड जिल्हा पोलीस हे सर्व मापदंडामध्ये आपल्या कामगिरीत सातत्य टीकवुन असुन भविष्यातही अशाच उज्ज्वल यशाची खात्री बाळगुन आहे.

सदरचे यश हे तत्कालीन मा.विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.संजय मोहिते, पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे, अपर पोलीस अधिक्षक श्री.सचिन गुंजाळ व सध्याचे अपर पोलीस अधिक्षक श्री.अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कामगिरी करीताचे आहे.

सदरच्या यशाकरीता मा.पोलीस अधिक्षक श्री. सोमनाथ घार्गे, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.अतुल झेंडे यांनी जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ यांचे अभिनंदन के ले आहे. यापुढेही मा.पोलीस अधिक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली
रायगडवासीयांच्या सुरक्षिततेकरीता रायगड पोलीस दल कटिबद्ध आहे अशी माहिती जन संपर्क अधिकारी पोलीस अधिक्षक, रायगड यांचे कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com