साक्षात पोलीस देवदूताचा मदतीचा हात……तिरोडा पोलीसांचे उल्लेखनीय कार्य…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
*मानवता हीच खरी ईश्वर सेवा या म्हणीला साजेसे असे कार्य…
🔸 याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक 11/10/2023 रोजी रात्री 11.00 वा. चे सुमारास नवेझरी गावचे पोलीस पाटील श्री.ओम भांडारकर यांनी पोलीस ठाण्यास माहिती दिली की, नवेझरी गावासमोर नाल्याजवळ एक महिला डांबरी रोडच्या बाजूला मृत अवस्थेत पडून आहे. त्यावरून तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. देविदास कठाळे, सोबत पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार पुंडे, पोलिस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड, पोलिस पोहवा कुळमेते, पो.अमंलदार अख्तर व महिला सैनिक चौधरी यांच्यासह नवेझरी गावांमध्ये जाऊन सदर प्रकरणाची शहानिशा केली असता सदर महिला मृत नसून मतिमंद आणि अशक्तपणा आल्याने त्या ठिकाणी पडून आहे, असे लक्षात आले. थोड्या वेळाने तिला पाणी दिल्यानंतर तिला थोडे बरे वाटले. त्यानंतर तिला नवेझरी येथे आणून जेवण दिल्यानंतर ती बोलण्याच्या परिस्थीतीत आल्याने महिला सैनिक शिला चौधरी यांच्या कडून विचारपुस केली असता तिने गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील 5-6 वेगवेगळ्या गावांची नावे सांगितली. त्यानुसार सदर गावांमधील पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते यांना तिचे फोटो पाठवून शहानिशा केली असता तिचे नाव गुड्डी मरकाम, वय अंदाजे 35 वर्षे असे असून ती तिची मावशी नामे निलवंता धूर्वे, रा.संभू टोली, ता.गोरेगाव यांच्याकडे राहत असल्याचे समजले. त्यामुळे एक टिम नेमून तिला गोरेगाव पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस उपनिरीक्षक गाते यांची मदत घेऊन सदर महीलेला तिच्या मावशीकडे दिनांक 12/10/2023 रोजी सकाळी 04.00 वा. चे सुमारास सुखरूप सोडण्यात आले आहे. सदर महिलेला योग्य वेळी पोलीस मदत मिळाल्याने तिला वन्य प्राणी व समाजकंटकांद्वारे मोठा अपराध घडण्यापासून वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे सर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर सर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मडामे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. मा. वरिष्ठांनी केलेल्या कार्याचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com