साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना मंजूर..

प्रतिनिधी- मंगेश उईके
पालघर:– दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व त्यातील 12 पोटजाती – मांग, मातंग, मिनीमादीग, मादींग, दानखणी मांग, मांगमहाशी, मदारी, राधेमांग ,मांग-गारुडी, मांग-गारोडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील 18 ते 50 या वयोगटातील दारिद्रय रेषेखालील (वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 300000/ पर्यंत) बेरोजगारांकरिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात.
त्यामध्ये राज्य शासनाच्या योजनांस एनएसएफडीसी दिल्ली महामंडळाच्या योजनांचाही समावेश आहे.
सन 2023-24 या वित्तीय वर्षाकिीता एनएसएफडीसी योजनेअंतर्गत महामंडळाकरिता योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्या अंतर्गत पालघर जिल्हयाकरिता देण्यात आलेले योजनानिहाय उदिदष्ट पुढीलप्रमाणे-
एनएसएफडीसी सुविधा कर्ज योजनेसाठी प्रकल्प 1 मर्यादा रु. 5 लाख तसेच पालघर जिल्हा उदिदष्ट 25 आहे, एनएसएफडीसी महिला समृध्दी कर्ज योजनेसाठी प्रकल्प् 1 मर्यादा रु. 1.40 लाख तसेच पालघर जिल्हा उदीष्ठ 15 आहे, एनएसएफडीसी शैक्षणिक कर्ज योजनेसाठी देशांतर्गत अभ्यासक्रम रु. 30. लाख तर विदेशांतर्गत अभ्यासक्रम रु. 40.लाख इतकी प्रकल्प मर्यादा आहे.
या सर्व योजनांचे कर्जप्रस्ताव दि. 15/03/2024 पर्यँत महामंडळाच्या वेबसाईट प्रणाली (Portal) https://beta.slasd.org द्वारे स्विकारले जातील.
तसेच महामंडळाच्या थेट कर्ज योजना (प्रकल्प्ा रक्कम रु. 100000/-) मध्ये सन 2023-24 या वित्तीय वर्षातील शिल्ल्क 20 भौतिक उदिष्टाकरिता इच्छुक अर्जदारांनी दि. 21/02/2024 ते 21/03/2024 या कालावधीत महामंडळाच्या पालघर जिल्हा कार्यालयात कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रांसह कर्जप्रस्ताव दाखल करावेत.
कर्जप्रस्ताव सादर केल्यानंतर महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार मंजूरी संदर्भातील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
अधिक माहितीकरिता जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न् लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आफरिन अपार्टमेंट, ए-विंग.रु.नं.203, विक्रीकर कार्यालया शेजारी, नवली रोड, पालघर पिन-401 404 दूरध्वनी क्र. 022- 25388413 येथे संपर्क साधावा. असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबई यांनी केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com