सहकारनगर पोलीस स्टेशन कडुन सराईत गुंडावर एम.पी.डी.ए प्रमाणे कारवाई

पुणे
सह संपादक- रणजित मस्के
पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी कृल्यांना आळा बसविण्याकरिता मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक पावले उचलली असून त्यासाठी पुणे शहरातील सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पुणे शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेले होते.
त्याप्रमाणे सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे चा गुन्हे अभिलेखावरील सराईत व अटल गुन्हेगार नाने साहिल ऊर्फ भावख्या संतोष कुचेकर, वय २१ वर्षे, रा. उकरंडे रेशनिंग दुकानाचे पाठीमागे, तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे याचे विरुद्ध सहकारनगर पोलीस स्टेशन येथे सन २०२२ सालापासुन आजपर्यंत गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय आहे. त्याचेविरुध्द शरिराविरुध्यचे व मालमत्तेविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन त्यामध्ये घातक हत्यारे जवळ बाळगुन मनाई आदेशाचा भंग करुन दहशत निर्माण करणे, दुखापत करणे, वाहनांची तोडफोड करणे, जबरी चोरी करताना खुनाचा प्रयत्न करणे यासारखे एकुण ०५ गंभीर स्वरुपाच्या गुन्हयांचा समावेश आहे.
सराईत गुंड साहिल ऊर्फ भावळ्या संतोष कुचेकर, वय २१ वर्षे, रा. उकरंडे रेशनिंग दुकानाचे पाठीमागे, तळजाई बसाहत, पद्मावती, पुणे याचेविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुनही त्याचे वागणुकीत काहीएक फरक पडलेला नव्हता. तो अत्यंत फुर, खुनशी व भांडखोर असुन तो लोकांमध्ये काहीना काही कुरापती काढुन मारहाण करुन गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे. तेथील सर्वसामान्य, शांतताप्रिय नागरीकांना विनाकारण त्रास देवून आपला गुन्हेगारी हेतु साध्य करीत आहे. तसेच बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगून लोंकामध्ये दहशत निर्माण केली आहे. त्याचे दहशतीमुळे व मितीपोटी त्याचेविरुध्द तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नव्हते. त्याचे अशा कृत्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे मनात मिती निर्माण होवुन त्यांचे जिवीतास व मालमत्तेस थोका निर्माण झाला होता. म्हणून श्री. राहुल गौड, सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी त्यास स्थानबदध करणे बाबतचा प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांना सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करून मा. पोलीस आयुक्त सोो पुणे शहर यांनी दि २३/०१/२०२५ रोजी नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे स्थानबदध करण्याचे आदेश दिले.
मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांजकडुन स्थानबद्ध आरोपीचा नागपुर या ठिकाणी आदेश झाले पासुन सदर आरोपी मिजुन येत नव्हता. सदर आरोपीची सहकारनगर तपास पथकाने माहीती मिळवुन आरोपीस शिखर शिंगणापुर ता. भाग (दहिवडी), जि. सातारा या भागातुन ताब्यात घेवुन दि. ०२/०१/२०२५ रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करुन नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे रवानगी करण्यात आली आहे.
सराईत गुन्हेगारा कडून अशा प्रकारे कोणताही अनुचीत प्रकार घडु नये या अनुषंगाने पोलीसांकडुन समाजकंटक व अटल गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असुन त्यांचेविरुध्द अश्या प्रकारच्या कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीसांनी दिले आहेत.
सदर कारवाई श्री. प्रविणकुमार पाटिल अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग, पुणे शहर, मा. स्मार्तना पाटिल पोलीस उप आयुक्त, परि-२ पुणे. श्री राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग यांचे मार्गदर्शना खाली श्री. राहुल गौड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे. सुरेखा चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार भाऊसाहेब आहेर, अमोल पवार, महेश मंडलिक, सागर सुतकर, विनायक एडके, बजरंग पवारे, आकाश किर्तीकर, अमित पदमाळे, गोरख ढगे, योगेश बोले, महेश भगत, प्रदिप रेणुसे, खंडु शिंदे यांनी केली आहे.