आतंर राज्यातील घरफोडी करणारी टोळी सहकारनगर पोलीसांनी घेतली ताब्यात…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :- एकूण १७,८२,४७९ /- रुपये किंमतीचे विविध कंपनीचे एकूण ६५ मोबाईल फोन सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडुन जप्त..

दि. २४/०७/२०२५ रोजी ०४.३० वा सुमारास चव्हाणनगर कमानी शेजारी फिर्यादी मनोज विजय झंवर यांचे श्रीराम कम्युनिकेशन नावाचे मोबाईल शॉपी दुकानचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्याने २९.६४.५९६/- रुपये किमतीचे एकुण ९५ मोबाईल फोन चोरून नेले. त्याचावत सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुरतं २४६/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५, ३३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचा तपास चालु असताना बदलापुर पुर्व पोलीस स्टेशन ठाणे शहर येथे संशयित घरफोडीचे आरोपी तामे १) मोबीन मुना देवान वय ३६ वर्ष रा. बिरता चौक हसननगर घोडासन, ठाणा घोडासन राज्य बिहार २) वरुण किशोरी सहा वय ५२ वर्ष रा. वॉर्ड नं.१७, मोतीहारी मठीया डीह, ठाणा छतावणी राज्य बिहार ३) शमसाद आलम सरकउल अन्सारी वय ३६ वर्षे रा. अठमुहाण जिल्हा मोतीहारी ठाणा झादौखद राज्य बिहार यांना ताब्यात चेण्यात आले होते. सदरचे आरोपीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाचे सहकारनगर पोलीस स्टेशन यांनी खात्री काम्याचे आदेश दिल्याने सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोवरे व तपास पथकातील स्टाफ बदलापुर पुर्व पोलीस स्टेशन ठाणे शहर येथे जावुन सपर आरोपीबी खात्री करुन मा. न्यायदंडाधिकारी सो, प्रथमवर्ग ६ वे सह दिवानी न्यायालय उल्हासनगर यांचे परवानगीने सदर आरोपींना आधारवाडी कारागृह कल्याण येथुन ताब्यात घेवुन सहकारनगर पालीस स्टेशन कडील दाखल गुन्हयात अटक करुन सदर आरोपीकडे तपास करुन एकूण १७.८२.४७९ /-रुपये किंमतीचे विविध कंपनीचे एकुण ६५ मोबाईल फोन जप्त केले आहेत.

सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त सती पश्चिम प्रादेशीक विभाग श्री.प्रविणकुमार पाटील सही, पोलीस उपायुका परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील सतो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिनी वंन्याणी सत्रो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे, सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे याचे नार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे, सहा. पोउपनिरी बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, अमित प‌द्माळे, सागर कुंभार, सागर सुतकर, बजरंग पवार विशाल वाघ, खंडू शिंदे यानी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट