सहकार भारती पालघर जिल्हा व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर ह्यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित बोईसर परिसर सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संचालक मंडळ प्रशिक्षण…!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर.:-

दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी ,जिल्हा पालघर येथे,… सहकार भारती पालघर (पश्चिम) हाउसिंग प्रकोष्ठ आयोजित हाउसिंग प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रम बोईसर येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास बोईसर, डहाणू येथील हाउसिंग सोसयटी सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक निबंधक गुजराथी सर, प्रमुख वक्ते ॲड.दिनेश पाटील, यांची उपस्थिती होती.
हाउसिंग सोसायटी चे, हक्क, कर्तव्ये, जबाबदारी या संदर्भात गुजराथी सर आणि दिनेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सहकार भारतीचे पदाधिकारी हाउसिंग प्रकोष्ठ प्रमुख सौ. मनीषा राऊत पतसंस्था प्रकोष्ट प्रमुख सौ. कौमुदी काळे, सह प्रमुख .अनंतकाका कुडू, बँक प्रकोष्ट प्रमुख . हेमंत पाटील, औद्योगिक प्रकोष्ट प्रमुख सौ. मीनल वैद्य, सौ.आदिती काळे, सौ.स्मिता कामत, सौ. सीमा उईके,कार्यकारनी सदस्य.मंगेश उईके, संपर्क प्रमुख . मनीष कांबळी, लीलेशजी किणी, सचिव . संकेतजी कुडू महामंत्री . नितीनजी वझे, अध्यक्षा सौ. पूर्वा सावंत, संघटन मंत्री . राजेशजी खामकर हाउसिंग प्रकोश्ठ सह प्रमुख सुजाता जी पागधरे, कविता जी वाझे यांचा सहभाग होता.

कार्यक्रम यशस्वी कारण्या साठी TJSB बँक बोईसर यांनी मोलाची भूमिका साकारली.
हाउसिंग सोसायटी ना उपयुक्त असे नवीन ॲप बद्दल TJSB ने उपस्थित सोसायटी ना मार्गदर्शन केले.

पुढील वाटचाली साठी मार्गदर्शन करण्या साठी सौ. अश्विनी ताई बुलाख सदस्य राष्ट्रीय कार्यकारीणी व हाउसिंग प्रकोष्ठ प्रमुख महाराष्ट्र प्रदेश जातीने उपस्थित होत्या.
सोबत श्रीमती. जयाताई आलिमचंदानी बचत गट सहाप्रमुख महाराष्ट्र प्रदेश या देखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या. भरत जी चिंचोले केंद्रीय कार्यालयीन सह प्रमुख उपस्थित होते.

सहकार भारतीचा पालघर (पश्चिम) जिल्ह्यातील प्रत्येक कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून सतत संपर्क ठेवून मार्गदर्शन करणारे . प्रवीण दादा बुलाख सह संघटन प्रमुख महाराष्ट्र प्रदेश , व सौ. वीणा ताई मोकाशी सहप्रमुख सहकार भारती कोकण विभाग यांचे विशेष मार्गदर्शनात कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट