सागर सहकारी साखर कारखान्यातल्या गन मेटल चोरणारा स्था गुन्हे शाखा जालनाच्या ताब्यात

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

जालना

जालना जिल्ह्यातील सागर सहकारी साखर कारखाना, तिर्थपुरी, जालना येथे दिनांक २२/०३/२०२५ रोजी कारखान्याच्या स्टोअर रुममधुन गन मेटल सॉलीड बार, हॅलोबार, रॅकटैंगुलर बार असे रुपये १,३५,४२०/- किंमतीचे दहा नग चोरी झाले बाबत फिर्यादी नामे विजय बाबासाहेब कळकटे यांचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे तिर्थपुरी येथे गु.र.नं. ४२/२०२५, कलम ३०३ (२) भा.न्या. सं. अन्वये गुन्हा दाखल होता.

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे नमुद चोरांची माहिती घेत असतांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली कि, ईसम नामे कैंसर निसार शेख, वय ४७ वर्ष, रा. वॉर्ड क्रं. १, मिल्लत नगर, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर ह्याने साथीदारासह गुन्हा केल्याची माहिती मिळाल्याने त्यास श्रीरामपुर येथुन ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातुन गुन्ह्यातील गेला माल एकुण १,११,५८५ रुपये किंमतीचा गणमेटल धातूचे विविध बार जप्त करण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, लक्ष्मीकांत आडेप, ईरशाद पटेल, देविदास भोजने, सतीश श्रीवास, सागर बाविस्कर, आकुर धांडगे, कैलास चेके यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट