सुरक्षा पोलीस टाईम्स न्यूज पाहताच साकडी – कुसगाव येथील महिलेने थेट पोलीस ठाणे गाठलं…

उप संपादक – राकेश देशमुख
महाड:- महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे एक महिला काही दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती.


नातेवाईकांनी आजूबाजूला तपास केला मात्र बेपत्ता महिलेचा तपास लागला नाही. दिपाली दिनेश शिंदे असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव असून बेपत्ता महिलेचा शोध लागण्याकरिता पोलिसांनी बातमी प्रकाशित करण्याकरिता पत्रक काढले. त्या पत्राच्या अनुषंगाने सुरक्षा पोलीस टाईम्स चॅनलचे प्रतिनिधी यांनी डिजिटल मीडियावर बातमी प्रकाशित केली.
बातमी व्हायरल होताच बेपत्ता महिलेने पोलिसांशी संपर्क केला व मी पोलीस ठाण्यामध्ये येत आहे असे सांगितले. दहा दिवसापासून बेपत्ता असलेली महिला कुठे आणि कधी सापडणार याचा शोध पोलीस घेत होते. पोलिसांनी तांत्रिक सहाय्याच्या मदतीने महिलेचा शोध घेतला. यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर. के. गोरेगावकर व पोलीस अंमलदार श्री. बल्लाळ यांनी बेपत्ता महिलेला पोलीस ठाण्यात आणून मिसिंग तपास पूर्ण केला.