सफाळा पोलीस ठाणे हद्दितून वाहन चोरी करून बोईसर येथे सोन्याची चैन जबरीने चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला सफाळा पोलीस ठाणे यांचेकडून अटक

उपसंपादक – रणजित मस्के
पालघर :- दिनांक १५/०७/२०२३ रोजी एका अज्ञात इसमाने फिर्यादी यांचेकडून फिर्यादीच्या मालकीची स्कुटी नं. MH 48.CG-9387 ही चहा पिऊन येतो असे खोटे सांगून वर नमूद स्कुटी ही स्वतःच्या फायदयाकरीता लबाडीच्या ईरादयाने मौजे पारगाव गावदेवी मंदीराचे समोर असलेले ओम साई अॅटो सव्र्हस सेंटरचे समोरुन पारगाव येथून चोरी करुन पळुन गेला म्हणून सफाळा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६५/२०२३ भा.द.वि.सं. कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये श्रीमती निता पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / अमोल गवळी, प्रभारी अधिकारी, सफाळा पोलीस ठाणे यांनी पोलीस पथक तयार करून गुन्हेगाराची गुन्हे करण्याची पध्दत तसेच सीसीटिव्ही फुटेज व इतर तांत्रिक व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने दि.१७/०७/२०२३ रोजी आरोपी कमलेश रामानंद गुप्ता, वय ३३ वर्षे, रा. रूम नं. २०४, पियुष मॅजेस्टीक, निर्मलनगर रोड, दिवा (प), जि.ठाणे यास त्याचे राहते पत्यावर जावून रात्रीचा सापळा रचून त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता आरोपी याने वरील नमूद स्कुटी घेऊन बोईसर येथे पादचारी महीलेच्या गळयातील १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरीने खेचून गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदर आरोपीस अटक केलेली असून त्याचेविरुध्द सफाळा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. T ६५ / २०२३ भा.द.वि.सं. कलम ३७९ अन्वये व बोईसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २८४ / २०२३ भा.द.वि.सं. कलम ३९२ अन्वये गुन्हे दाखल करून त्याचेकडून गुन्हयातील गेला माल ४०,०००/- रुपये कि.ची अँटॉर्क १२५ स्कुटी क्रमांक MH48 CG9387 स्कुटर व स्कुटरचे डिक्कीमधून ६०,०००/- रुपये किमतीची १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हस्तगत केलेली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास हा सपोनि / अमोल गवळी, प्रभारी अधिकारी, सफाळा पोलीस ठाणे हे करीत आहेत.

आरोपीचा गुन्हेगारी अभिलेख तपासला असता त्याचेविरुद्ध यापूर्वी खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.नं.
पोलीस ठाणे मुंब्रा पोलीस ठाणे
१
कोपरखैराणे पोलीस ३३७ / २०१९
ठाणे
रबाळे पोलीस ठाणे
३
४
५
नालासोपारा पोलीस
ठाणे
वापी पोलीस ठाणे
६
मुंब्रा पोलीस ठा
मुंब्रा पोलीस ठाणे
८
मंत्रा पोलीस ठाणे
मुंब्रा पोलीस ठाणे
विष्णुनगर
१०
ठाणे
५१९/२०१९
५३८ / २०२२
११२/२०२३
२२०/२०२३
२२६/२०२३
पोलीस ७१ /२०२३
११
| नौपाडा पोलीस ठाणे
गुन्हा रजि. क्रमांक कलम ३१०/२०१७
भादंवि कलम ४२०, ४६८, ४६९,४७१,
१८८,३४
भादंवि कलम ३९२, ४५२
भादंवि कलम ३९२, ४५१,३४१, ५०६
भादंवि कलम ३९४, ३२३, ५०६ सह आर्म
अॅक्ट ३२५ प्रमाणे
भादंवि कलम ३७९
भादंवि कलम ३७९, ३४
भादंवि कलम ३९२
भादंवि कलम ३९२
भादंवि कलम ३९२
२४९/२०२३
२५० / २०२३
भादंवि कलम ३९४
८७/२०२३
भादंवि कलम ३७९
सदरची कामगिरी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक पालघर, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती निता पाडवी, उप विभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग, सपोनि / अमोल गवळी, प्रभारी अधिकारी, सफाळा पोलीस ठाणे, पोउपनि / मनिकेरी, बोईसर पोलीस ठाणे, पोहवा / ८४२ ए. व्ही.खोत, पोहवा / ८२० के.बी. शेळके, पोना / २२ व्ही. एन. सातपुते सर्व नेमणूक सफाळा पोलीस ठाणे, पोहवा / ४२८ विजय दुबळा, पोशि/८४ मयूर पाटील, पोशि/ २८० धिरज साळुंखे, नेमणूक बोईसर पोस्टे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com