तलवार घेऊन दहशत माजवणारा हद्दपार आरोपी सचिन चौधरी जळगाव एमआयडीसी पोलीसांच्या जाळ्यात..

उपसंपादक-रणजित मस्के
जळगाव:– दिनांक 06/03/2024 रोजी मा. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपणीय माहीती मिळाली की, जळगाव जिल्हयातुन 02 वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेला आरोपी सचीन उर्फ टिचकुल कैलास चौधरी रा तुकामरावाडी हा तुकारामवाडी परीसरात हातात लोखंडी तलवार घेवुन दहशत माजवित आहे बाबतची माहीती मिळाल्यावरुन रात्री 11.00 त्यास हनुमान मंदीर परीसर तुकारामवाडी येथुन ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याचेकडुन एक लोखंडी तलवार मिळुन आल्याने सदर तलवार ही जप्त करण्यात आली असुन त्याचेविरुध्द एमआयडीसी पोस्टे गुरनं. 146/2024 मुपोका 142 सह आर्म अॅक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री डॉ. महेश्वर रेड्डी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावीत जळगाव भाग, मा. पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, पोहेका. रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, पोना योगेश बारी, नाना तायडे, किरण पाटील, ललील नारखेडे अशांनी यांनी केली आहे.
हद्दपार ईसमावर एमआयडीसी पोलीस स्टेशन ला 05 गुन्हे व जिल्हापेठ पोस्टे ला 02 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com