साताऱ्यात एका शेतकऱ्याची फसवणूक करून खरेदी खत करणाऱ्यांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

उंब्रज : दिनांक 5 डिसेंबर 2021 रोजी साताऱ्यातील कराड तालुक्यातील शामगांव येथे एका शेतकऱ्याला साखरेचे कार्ड काढून देतो असे सांगून पॅनकार्ड व आधारकार्ड घेऊन किसन उर्फ कृष्णा गणू पोळ वय 92 वर्षे रा. शामगाव ता. कराड यांची एकुण 6 एकर 10 गुंठे जमीन उंब्रज येथील दुय्यम निबंधक कार्यालयात फसवणूक करून खरेदी खत करुन घेतलेल्या गावातील दोघा जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचा तपास करण्याच्या अनुषंगाने सपोनि श्री. अजय गोरड यांनी संशयितांना रविवार दि. 5 डिसेंबर रोजी ताब्यात घेऊन अटक केली.
रमेश शंकर पोळ वय 32 वर्षे व शंकर बाजीराव पोळ वय 59 वर्षे हे दोघे रा. रा. शामगांव ता. कराड जि. सातारा अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की , किसन ऊर्फ कृष्णा गणु पोळ वय 92 वर्षे रा. शामगांव ता. कराड यांनी सदर फसवणुकी बाबत दि. 19 जुलै रोजी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फसवणूकी प्रकरणी दोघा जणांना उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड यांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलीस करत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com