ग्रामीण रुग्णालय पालघर येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न..

उप संपादक – मंगेश उईके
पालघर : – दि.१ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, पालघर यांच्यामार्फत ग्रामीण रुग्णालय पालघर येथे डॉक्टर दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पालघर जिल्ह्यात गोरगरीब रुग्णांची नियमित सेवा करत असतानाच रक्तदान शिबिरासारखा समाजोपयोगी उपक्रम घेऊन आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आगळावेगळा आदर्श प्रस्तुत केला.




या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ७९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या प्रसंगी संघटनेचे पालघर अध्यक्ष डॉ. रितेश पटेल कार्याध्यक्ष डॉ. तनवीर शेख, सचिव डॉ. भाऊसाहेब चत्तर, कोषाध्यक्ष डॉ. प्रांजली पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सागर पाटील, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश सुरळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लोहारे,तालुका आरोग्य अधिकारी तलासरी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी वाडा डॉ. शरयू तुपकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. अजय ठाकरे यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी शिबिरात सहभाग घेतला.या शिबिरात शरद जाधव ( पालघर तालुका अध्यक्ष रिपाई) सह अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यात सहकार्य केल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे आभार.