सोलापूर जिल्हयातील अवैध दारू धंद्यावर कारवाईसाठी ग्रामीण पोलीसांची ‘विशेष मोहीम’…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सोलापूर :- श्री. क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारी बंदोबस्त संपताच सोलापूर ग्रामीण पोलीसांनी जिल्ह्यातील अवैध दारू धंद्यावर कारवाई करण्यासाठी “विशेष मोहीम” हाती घेतली आहे. यासाठी मा. पोलीस अधीक्षक यांनी ऑपरेशन परीवर्तन मधील बरेच पालक अधिकारी यांची बदली झाल्याने नवीन अधिकारी नेमून ‘ऑपरेशन परीवर्तन ‘ हा उपकम नव्याने सुरू केला आहे.

दिनांक ०६/०७/२०२३ रोजी जिल्ह्यातील अवैध दारू निर्मीती व विक्री करणारे ठिकाणी विशेष मोहीम अंतर्गत छापे घालण्यात आले असून त्यामध्ये पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात अवैध दारूचे एकूण २२ गुन्हे गुन्हे दाखल करण्यात आले असून २८,४०५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे ऑपरेशन परीतवर्तन अंतर्गत एकूण ६ केसेस करण्यात आले असून त्यामध्ये ५६०० लिटर २,७९,८००/- रूपये किंमतीचे गुळमिश्रीत रसायन जप्त करून नाश करण्यात आले आहेत. तर २० लिटर ६५०/- रूपये किंमतीची हा. भ. दारू जप्त करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कुर्डवाडी पोलीस ठाणे अंतर्गत ३८ देशी दारूच्या क्वॉर्टर बाटल्या किंमत रुपये २५२०/- जप्त करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण २८ गुन्हयात ३,११,३७५/- रूपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे.

विशेष मोहीम व ऑपरेशन परीतर्वतन अंतर्गत दररोज कारवाई करण्यात येणार असून जिल्ह्यातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्यात येणार आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट