पालघर मध्ये मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी ” Run For Vote ” मॅरेथॉनचे आयोजन..

प्रतिनिधी- मंगेश उईके
पालघर :– मा. भारत निवडणुक आयोगाकडुन लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-2024 हा कार्यक्रम घोषित झालेला आहे. त्यानुषगाने पालघर जिल्हातील मतदारांमaध्ये जनजागृती करुन मतदानासाठी प्रवृत्त करणे आयोगाकडील या विषयी स्थायी सुचना आदेशांची अंमलबजावणी करणे व नागरिकांमध्ये निवडणुक विषयी जनजागृती करण्यासाठी SVEEP (Systematic Voters Education Program) जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर मोहिम राबविण्यात येत आहेत. पालघर जिल्हयातील नागरीकांना मतदान करणेकामी प्रवृत्त करणेच्या दृष्टीकोणातुन दिनांक 05/05/2024 रोजी मा. जिल्हाधिकारी, पालघर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रिडा अधिकारी, पालघर यांच्या सन्वयाद्वारे विविध वयोगटातील सर्वसामान्य नागरीकांसाठी “Run For Vote” मॅरेथॉन कार्यक्रमाचे खालीलप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.

मॅरेथॉन सहभाग :-
पालघर जिल्ह्यातील विविध वयोगटातील महिला / पुरुष, शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्व आस्थापनांवरील शासकीय / निमशासकीय / खाजकी नोकरीतीली अधिकारी / कर्मचारी आणि पालघर व परिसरातील कोणताही इच्छुक व्यक्ती व सर्वसामान्य नागरीक “Run For Vote” मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवू शकतात.
नियम व अटी :-
- “Run For Vote” मॅरेथॉन मध्ये कोणत्याही वयोगटील स्त्री / पुरुष सहभागी होऊ शकतात. 2. 3 कि.मी., 5 कि.मी., 10 कि. मी अशा विविध मॅरेथॉनपैकी कोणत्याही एकाच प्रकारच्या मॅरेथॉन मध्ये भाग घेता येईल.
a 3 किमी फन रन पुरुष आणि महिला = 16 वर्षाखालील वयोगट 17 ते 45 वर्षे वयोगट 45 वर्षांवरील वयोगट
b ५ किमी-धाव –
16 वर्षाखालील पुरुष आणि महिला वयोगट 17 ते 45 वर्षे वयोगट 45 वर्षांवरील वयोगट
c 10 किमी-धाव – 16 वर्षाखालील पुरुष आणि महिला वयोगट
17 ते 45 वर्षे वयोगट 45 वर्षांवरील वयोगटातील
- मॅरेथॉन साठी सर्व भाग घेतलेल्या धावपटू यांनी दिनांक 05 में, 2024 रोजी सकाळी ठिक 06:00 वाजता पाचबत्ती हुतात्मा स्तंभ, पालघर येथे उपस्थित रहावे.
- मॅरेथॉन पूर्ण करणा-या प्रत्येक सहभागी व्यक्तीस “Unique Finisher Medal” व प्रमाणपत्र
देण्यात येईल.
- मॅरेथॉन मधील प्रत्येक धावपटूला आकर्शक टी-शर्ट देण्यात येईल. 6. मॅरेथॉन मार्ग खालीलप्रमाणे :-
i)
3 KM (मजेची धाव) = पाचबत्ती हुतात्मा स्तंभापासून स्वातंत्र्य वीर सावरकर चौकापर्यंत (कोणतेही वळण नाही) आणि स्वातंत्र्य वीर सावरकर चौक (कोणतेही वळण नाही) ते पाचबत्ती हुतात्मा स्तंभ येथे समाप्त.
ii) iii 5 KM = पाचबत्ती हुतात्मा स्तंभ ते स्वातंत्र्य वीर सावरकर चौक (मागे फिरू नका) ते डॉ. आंबेडकर चौक ते नवीन सातपाटी मार्ग ते पाचबत्ती हुतात्मा स्तंभ येथे नमुने.
) 10 KM पाचबत्ती हुतात्मा स्तंभ ते स्वातंत्र्य वीर सावरकर चौक (वळण नाका) ते डॉ. आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (माहीम-पालघर मार्ग) ते देविशा मार्ग ते पाचबत्ती हुतात्मा स्तंभ.
7.3/5/10 किमी धावणे मॅरेथॉन बक्षिसे :-
a प्रथम पारितोषिक ट्रॉफी
b द्वितीय पारितोषिक – करंडक
c तिसरे पारितोषिक – ट्रॉफी
- रेस सपोर्ट आणि न्युट्रीशन पोषण :-
a योग्य हायड्रेशन पौष्टिक पेये दिली जातील.
b. अत्यावश्यक परिस्थितीमध्ये प्राथमिक वैद्यकीय सहाय्य पुरविले जाईल.
c. सर्व धावपटूंना धावल्यानंतर नाश्ता दिला जाईल.
d. फक्त वैध BIBs (Time Tracking) असलेल्या धावपटूंनाच नाश्ता दिला जाईल.
e. सर्व सपोर्ट स्टेशन्स आणि स्वयंसेवकांना दिलेल्या कटऑफ वेळेनंतर बाजुला केले जाईल.
f. पार्किंग जागा उपलब्ध नसल्याने, नियोजीत स्थळी पोहचण्यासाठी आपण आपल्या स्तरावर प्रवासाचे नियोजन करावे. स्तंभ येथे समाप्त.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com