कुपवाड मध्ये “सडक सुरक्षा जीवन सुरक्षा” अभियान रॅलीचे आयोजन संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :– मा. डॉ बसवराजजी तेली साहेब (SP) व मा.रितू खोखर (Add.Sp)मॅडमजी यांच्या मार्गदर्शनाखाली……प्रवास सुखकर होण्यासाठी सर्वांनी वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत ३० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता,कुपवाड येथे पोलीस निरीक्षक अविनाश पाटील व उप-महासमादेशक अनिल शेजाळे (वाहतूक सुरक्षा दल, महाराष्ट्र राज्य.) उपनिरीक्षक विश्वजीत गावडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रस्ता सुरक्षा अभियान रॅलीचा प्रारंभ झाला.
पोलीस दल, वाहतूक शाखा, शिक्षण विभाग तसेच वाहतूक सुरक्षा दल सांगली. यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी सहा.पोलीस निरीक्षक अविनाश पाटील,सहा.पोलीस निरीक्षक भगवान पालवे (वाहतूक शाखा मिरज),उप-महा समादेशक अनिल शेजाळे.उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे.डी.आय.अशोक कोळी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच आर एस पी अधिकारी प्रकाश पाटील, अभय कर्नाळे , दयानंद सरवदे उपस्थित होते.

या रॅलीमध्ये परिसरातील गुरुवर्य डॉ. टी.डी.लाड माध्यमिक विद्यालय, कुपवाड, देशभक्त आर.पी.पाटील माध्यमिक विद्यालय, कुपवाड, श्रीमती शालीनी रंगनाथ दांडेकर हायस्कूल, यशवंतनगर कुपवाड,आशालता उपाध्ये गर्ल्स हायस्कूल कुपवाड,झीलं इंग्लिश स्कूल कुपवाड.नवकृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड,शाळांचे ६०० शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांनी, आर एस पी बालसैनिक, पोलीस ,आरटीओ, ड्रायव्हिंग स्कूल वाहने व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या रॅलीमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी सर्व वाहनधारकांना स्वतःची सुरक्षा आपल्याच हातीच्या घोषणा देताना ढोल ताशांच्या गजरात जनजागृती केली. यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी रॅलीला मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.अतिशय शिस्तबद्ध रॅली, सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

सदर रॅली चावडी या मार्गाने तसेच गणपती चौक , सोसायटी चौक होत मुख्य मार्गाने सुरू होऊन देशभक्त आर पी पाटील विद्यालय कुपवाड या ठिकाणी. संपन्न झाली .सर्वांचे स्वागत आर पी पाटील विद्यालय च्या मुख्याध्यापिका यांनी केले.समारोपाच्या कार्यक्रमात सहा.पो.नि.भगवान पालवे व उप-महासमादेशक अनिल शेजाळे यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांविषयी माहिती देत मार्गदर्शन केले.सहभागी विद्यार्थ्यांनीनी वाहतूक नियमांची अंमलबजावणी स्वतः पासून करण्याची प्रतिज्ञा केली.यावेळी उप-महासमादेशक अनिल शेजाळे यांनी राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी व हुतात्मा दिनाचे औचित्य साधून उपस्थितांना ठिक ११ वाजता एक मिनिट स्तब्धता पाळून अभिवादन केले.त्यानंतर
सहभागी सर्व शालेय आरएसपी बालसैनिक विद्यार्थी- विद्यार्थिनींना कुपवाड पोलीस ठाणेकडून पाणी व खाऊचे वाटप करण्यात आले व यावेळी अभय कर्नाळे यांनी आभार मानून रॅलीचे सांगता केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com