रिक्षात विसरलेले १५ लाखाचे दागिणे डोंबिवली पोलीसांनी तक्रारदारास केले परत ..

उपसंपादक-रणजित मस्के
डोंबिवली :–
श्री मयूर मुंडे वय 31 वर्षे, राहणार- कांजू रमार्ग मुंबई हे त्यांचे कुटुंबीयांसोबत ठाकुर्ली रेल्वे स्टेशन ते राहते सोसायटी असा रिक्षातून प्रवास करीत असताना त्यांची 15 तोळे सोन्याचे दागिने तसेच कपडे असलेली बॅग रिक्षामध्ये विसरल्याची तक्रार डोंबिवली पोलीस ठाणेस प्राप्त होताच कर्तव्यावरील पोलीस ठाणे अंमलदार पोउपनि. चव्हाण, म.सपोउनि अर्दाळकर, मपोशि राजपूत यांनी तात्काळ दाखल घेऊन रिक्षाच्या मार्गिकेवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षा चालकाचा शोध घेऊन तक्रारदारास त्यांची बॅग व त्यामधील ११,२५,०००/- रू. किमती चे 15 तोळे सोन्याचे दागिने परत मिळवून दिल्याने त्यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांचे मनापासून मानले आभार.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com