यूट्यूब पाहून रिक्षा चोरणाऱ्या मेकॅनिकला जुहू पोलीसांनी ठोकल्या बेड्या …

उपसंपादक – रणजित मस्के
मुंबई :दिवसा रिक्षा दुरुस्त करायचा आणि रात्री रस्त्यावर पार्क केलेल्या रिक्षा चोरणाऱ्या मेकॅनिकला जुहू पोलिसांनी अटक केली.
देवराज राजू देवेंद्र असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून तीन चोरीच्या रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
तक्रारदाराने रविवारी रात्री सी. डी. बर्फीवाला रोड येथे रिक्षा पार्क केली. दुसऱ्या दिवशी रिक्षा जागेवर दिसली नाही. त्यांनी जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजितकुमार वर्तक यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय धोत्रे. महांगडे पाटील आदी पथकाने तपास सुरू केला.

पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यावरून देवराजला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने रिक्षा चोरल्याची कबुली दिली त्याने युट्युब वर जॉय राईड चा
व्हिडीओ पाहिला होता. त्यावरून त्याला रिक्षाचोरीची आयडिया सुचली
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com