मुंबईत जवळील भाडे नाकारून उलट महिला प्रवासी यांना सज्जड दम देणाऱ्या रिक्षा चालकावर गुन्हा दाखल…

प्रतिनिधी- गायत्री कदम
जुहू :– रविवार दिनांक २१|०४|२०२४ रोजी संध्याकाळची वेळ ८ वाजून १५ मिनिटाच्या सुमारास सुरक्षा पोलीस टाइम्सच्या प्रतिनिधी
सौ .गायत्री राहुल कदम ह्या जुहु येथे रिक्षासाठी उभ्या होत्या.

त्यांनी सांगितल्या प्रमाने आम्ही जुहू बीच पासून चालत आलो बाहेर रोडवर ,Escon ला जायला
रिक्षा विचारत असतानाही रिक्षा सरळ नकार देत असत
अर्धा तास रिक्षाची वाट बघितली, किती तरी रिक्षा फास्ट चालवून पुढे जात थांबण्याचे नाव नाही ,रिक्षावाला आला भाडे घेऊन जशी रिक्षा थांबली त्याला प्रामाणिक पणाने विचारले Escon ला येण्यासाठी तर नाही म्हणाला आणि म्हणाला की रिक्षा खराब आहे.नाही नाही म्हणत होता पहेले खोटे बोलू लागला, माझ्या समोर passenger आणतो आणि खोटे बोलतो ती चीड आली मला ही घाई होत होती देवळात जाण्याची कारण देऊळ ९ वाजता बंद होणार होते .
आम्ही जबरदस्ती बसलो मी, माझी मैत्रीण वर्षा वोरा ,माझ्या 2 मुली एक 15 वर्षाची आणि एक 12 वर्षाची, रिक्षा वाला 4 जनाचे बहाने सांगून आडी बाजी करू लागला
मी चार जणांना घेणार नाही, मी पुढे येणार नाही त्याला आम्ही सांगतोय की आम्ही बघु कोणी अडवले की आम्ही फाइन भरू, तो रिक्षा चालक आमच्या वर येवढा ओरडून बोलत होता की विचारू नका शेवटी माझी मुलगी म्हणाली की अंकल आप धीरेसे बात करो ? क्यूँ इतना चीला के बात कर रहें हो ? ,आम्ही महिलाच होतो पुरुष वर्ग कोणीही सोबत नव्हते ,म्हणुन तो महिलांना एकटे बघून तावातावाने बोलत होता.
मी विचार केला आत माझी सहनशक्ती संपली हा रिक्षा चालक एक मुसलमान असून आमच्यावर तावाताव करून दाखवतो आता तुला मराठी कितपत भारी पडतात दाखवावेच लागणार बघ, ह्याने असे भांडण करून वेळ घालून देऊळ बंद झाले ,वेळ संपवली म्हणून मी त्याला जुहू पोलिस स्टेशनला रिक्षा घ्यायला सांगितली परंतु त्याने रिक्षा रस्त्यातच थांबवली बाजूला जल्लोष बंगलों होता तो श्री अमिताभ बच्चन सरांचा होता.
आम्ही त्यावेळी पोलीस मदतीसाठी 100 हा नंबरवर फोन लावला, पोलिसांना वारंवार कॉल करुन शेवटी 1 तासानी पोलीस आले.
तेव्हा निर्भया पोलीस पथकाची गाडी आली तेव्हा त्यांना घडलेली सर्व घटना सांगितले आणि मला ह्या रिक्षा चालका विरुद्ध तक्रार नोंदवायची आहे. तेव्हा महिला पोलिस अधिकारी आम्हाला पोलिस स्टेशन ला घेऊन गेले व रिक्षा चालकावर तक्रार नोंद करून घेतली .
अशा प्रकारे मुंबईत जुहू येथे जवळील रिक्षाचे भाडे नाकारणाऱ्या व उलट धमकी देणाऱ्या रिक्षा क्रमांक. एमएच ०२ सीटी १९५० यांच्या विरोधात जुहू पोलीस ठाण्यात कलम ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com