सेवानिवृत्त सूर्यकांत राऊत यांना सन्मानित करीत दिला निरोप माणगांव तालुका महाराष्ट्र होमगार्ड पथक अधिकारी यांनी केला सत्कार…

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड:-माणगांव :-महाराष्ट्र शासन महाराष्ट्र होमगार्ड तालुका माणगांव पथक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 29 जुन 2025 रोजी माणगांव होमगार्ड सेवेत आपली सेवा बजवणाऱ्या सूर्यकांत राऊत यांचा सन्मानित करीत समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी अनेकांना गहिवरून आले होते.त्या पाश्वभूमीवर महाराष्ट्र होमगार्ड पथकाचे समादेशक अधिकारी समाउल्हाह शौकत अंतूले यांनी आपल्या प्रतिक्रियेत माणगांव पथकाचे सेवानिवृत्त सूर्यकांत राऊत तसेच मागील काही दिवसापूर्वी झालेले सेवानिवृत्त अधिकारी भगवान शिंदे, वासंती दाखीनकर,यांच्या विचारांचे कौतुक करून भरघोष अशा शुभेच्छा दिल्या.

होमगार्ड समादेशक अधिकारी समाउल्हाह अंतूले पुढे बोलताना म्हणाले की होमगार्ड पेशा हा नोकरी म्हणून न करता प्रत्येक होमगार्डने ते एक व्रत आहे अशी सेवा करावी गेली 24 वर्षात त्याच्या मनमिळाऊ व सेवावृत्ती स्वभावामुले त्यांनी अनेक होमगार्ड ना ज्ञान दिले अनेक मित्र जोडले सेवानिवृत्त सूर्यकांत राऊत जवळपास 24 वर्षे होमगार्ड सेवा केल्यानंतर निवृत्त झालेल्या कलमजे गावचे रहिवाशी सूर्यकांत राऊत यांचा सन्मान माणगांव पथकाचे होमगार्ड नितेश सुतार,रविद्र नवघरे, आदेश मोरे, सुशील वाटवे, अविनाश सोडकर, राकेश पालकर, सुनिल म्हसकर, अमित शिर्के,जयश्री गोसावी, नीलिमा शिंदे,वासंती दाखीनकर, अशोक सत्वे शंकर पडवळ, भगवान शिंदे अल्पेश कापडेकर, सतीश तलकर, नितीन शिर्के, राजु मोहिते व आदी होमगार्ड यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार समारंभ पार पाडला.