रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आ )खासदारकी सीट न दिल्याने पालघर जिल्ह्यातून महायुती संदर्भात तीव्र नाराजीचा सूर…

प्रतिनिधी- मंगेश उईके
पालघर :– मंगळवार दि.२६/०३/२०२४ रोजी पालघर जिल्ह्याची अति महत्त्वाची बैठक आयु.सुरेश जाधव (पालघर जिल्हा अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सन २०१२ पासून रिपाई महायुती सोबत असून सन २०१४ व सन २०१९ ला महायुतीचे खूप मोठ्या संख्येने उमेदवार संपूर्ण भारतभर निवडून आले होते. त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)चा सिंहाचा वाटा होता. मागील दोन टर्म केंद्रात मा.ना. रामदासजी आठवले साहेब मंत्री आहेत.

सन्माननीय आठवले साहेब हे महायुतीच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण भारतभर काम करीत असताना येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रिपाई च्या वतीने शिर्डी लोकसभा मतदारसंघ व सोलापूर लोकसभा मतदारसंघ अशा दोन जागेची मागणी भाजप कडे केली असताना आजतागायत एक सीट सुद्धा भाजपने आठवले साहेबांसाठी सोडली नाही त्यामुळे महाराष्ट्रातून रिपाई च्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

आमची भाजप व रिपाई ची नैसर्गिक युती असताना भाजपच्या कोट्यातून आठवले साहेबांसाठी सीट न सोडणे हे खूपच दुर्दैव असे प्रतिपादन यावेळी कार्यकर्त्यांनी केले. त्यामुळे वरील विषयासंदर्भात पालघर जिल्हा, महिला,तालुका, युवा, कार्यकारणीची अति महत्त्वाची बैठक पार पडली त्यात सर्व कार्यकर्त्यांमध्ये पालघर जिल्ह्यातून तीव्र नाराजीचा सूर आहे.
मा. ना.रामदासजी आठवले साहेबांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी ताबडतोब जाहीर करावी अशी मागणी पालघर जिल्हा च्या वतीने आयु.सुरेश जाधव (पालघर जिल्हाअध्यक्ष )यांनी यावेळी केली.
तसेच यावेळी पालघर तालुका युवा आघाडीच्या वतीने आयु. सचिन घाडीगावकर यांची तालुका संघटक पदी व आयु.राजू शेख यांची तालुका सहसंघटक पदी पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
सदरच्या मीटिंगसाठी पालघर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आयु. रत्नाकर भालेराव,सचिन लोखंडे उपाध्यक्ष कुंदन मोरे, संघटक पुष्पराज फुलारा, राजकुमार यादव युवक जिल्हा कार्याध्यक्ष विजेंद्र ठाकूर,वाडा तालुका अध्यक्ष आनंद भोईर, पालघर तालुका युवा अध्यक्ष शरद जाधव उपाध्यक्ष राम ठाकूर,संघटक सचिन घाडीगावकर, सहसंघटक राजू शेख,बिरबल खुशवाह,हितेश वाडिया,धनश्री जाधव, बाबू शेख, चहाडे शाखा अध्यक्ष संजय पाटील व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com