इन्श्युरन्स पॉलीसी बाबत आमिष दाखवून आर्थिक फसवणुक करणान्यास पूर्व प्रादेशिक सायबर गुन्हे शाखा मुंबई यांचेकडुन जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:- तक्रारदार यांना दि. १५/०६/२०२२ ते दि. ३१/१०/२०२२पर्यंत वेगवेगळ्या अनोळखी मोबाईल क्रमांका वरून अनोळखी आरोपीतांनी निहारीका कपुर, अलका विश्वास, अशोक महाजन, मनिष मल्होत्रा, राहुल जैन, राघव दयाल, संजय दिवाण व रोहित कुमार अशा वेगवेगळ्या नावांनी संपर्क साधून ते HDFC Life कार्यालयातून बोलत आहेत असे सांगितले. फिर्यादी यांच्या नावाची HDFC LIFE POLICY असल्याचे खोटे सांगुन तिचा लास्ट प्रिमियम २३ मार्च २०१५ रोजी भरलेला आहे असे सांगितले. सदर पॉलिसीची फन्ड रिलिज रक्कम 18,79,000/मिळणार असल्याचे आमिष दाखवुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्याकरीता HDFC Lifeचे बनावट अप्रुव्हल लेटर फिर्यादी यांच्या व्हॉट्अॅप वर पाठविले. त्यानंतर प्रोसेसिंग फी, ब्रोकरेज चार्जेस, टॅक्स चार्जेस व पॉलिसीची फन्ड रिलिज चार्जेस च्या नावा खाली त्यांची एकुण रूपये ११,१८,५५०/- ची आर्थिक फसवणुक केली होती त्यावरून पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. २९/२०२२, कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४७१, ३४ भादवि सह कलम ६६ (सी), ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपासात प्राप्त तपशीलाचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्हयाच्या तपासकामी पुर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाणेचे पोलीस पथक हे दिल्ली येथे रवाना झाले. त्यांनतर पोलीस पथकाने प्राप्त झालेल्या माहीतीच्या आधारे केलेल्या विश्लेषणावरून व केलेल्या तपासावरून सदर
गुन्हयामध्ये पुढील दोन आरोपीतांना अटक करण्यात आली.

१) भरत सिंह सुरेंद्र सिंह रावत, वय २९ वर्ष, रा.ठी. दिल्ली.
२) कमलकुमार गिरीशचंद्र पाल, वय ३० वर्ष, रा.ठी. दिल्ली.

अटक आरोपीताकडुन खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला.

1) One Plus 10 Pro 5G Mobile, IMEI No. 868368050743451 & 868368050743444.
Mob SIM No. 98109**.

2) TECNO No. 798269730bile. IMEI No. 350025280423925 & 350025280423933.
Mob SIM No. 88926**

गुन्हयाची पध्दत यातील आरोपी हे पिडीतानां मोबाईलव्दारे कॉल करून त्यांची पॉलीसी असल्याचे सांगुन पॉलिसीची फन्ड रिलिज रक्कम मिळणार असल्याचे आमिष दाखवुन प्रोसेसिंग फी, ब्रोकरेज चार्जेस, टॅक्स चार्जेस पॉलिसीवी फन्ड रिलिज चार्जेसच्या नावाखाली लोंकाची ची आर्थिक फसवणुक करतात.

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री. विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, मा. पोलीस उप आयुक्त डॉ. बाळसिंग राजपूत (सायबर गुन्हे), मा. सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र लोटलीकर, प्रभारी पो.नि. एस. एस. सहस्त्रबुध्दे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली श्रावगी, पोना ०३९८४/शेषनारायण शेटये व पोना ०३११२७ / माधव उतेकर यांनी पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट