वनपाल व वनरक्षक” यांनालाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर यांनी लाच स्विकारताना ताब्यात घेतले बाबत”…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पालघर :– लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर

गुन्हा नोंद कमांक

वालीव पोलीस ठाणे, जिल्हा पालघर

लोकसेवकाचे नाव व कार्यालय

१) श्री. पन्नालाल दिनकर बेलदार, वय ३५ वर्ष, वनरक्षक वर्ग-३. नेमणुक वापराळ विट, परिमंडळ अधिकारी कार्यालय, सातिवली, रेजनाका गोखिवरे ता. वसई, जि.पालघर

२) श्री. पंकज शांताराम सनेर, वय ४५ वर्ष, वनपाल, वर्ग-३, परिमंडळ अधिकारी कार्यालय, सातिवली, रेंजनाका गोखिवरे ता. वसई, जि. पालघर

मागितलेल्या लाचेची रक्कम

१,३०,०००/-रूपये.

स्विकारलेलो लाचेची रक्कम

आलोसे क. १ यांनी ४०,०००/- रूपये.

धोडक्यात हकीगत

तक्रारदार यांच्या मालकीची मुंबई-अहमदाबाद हायवेला समांतर चाळ आहे. सदर चाळीतील खोल्यांना हायवेच्या विरुध्द वाजुने दरवाजे आहेत. तकारदार यांनी सदर चाळीतील खोल्यांना येण्या-जाण्याच्या सोईकरीता हायवेच्या दिशेने दरवाजा काढण्याचे काम सुरु केले होते. यातील आलोसे कं २ यांनी तकारदार यांना दिनांक १६/०९/२०२४ रोजी कार्यालयात बोलावुन हायवेकडील बाजु ही वन विभागाची हदद् असल्याचे सांगुन त्या बाजुस दरवाजे काढायचे काम केले असल्याने तकारदार यांचेविरुध्द वन कायदयानुसार तात्काळ कारवाई करण्याची धमकी दिली. तकारदार याने कारवाई न करण्याची विनंती केली असता आलोसे के १ व २ यांनी तकारदार यांचेकडे लागलीच प्रत्येक खोलीमागे ८०,०००/- रुपये अशी ३ खोल्यांकरीता लाचेची मागणी केली व तकारदार यांनी कारवाई टाळण्याकरीता नाईलाजास्तव मागणी केलेल्या रकमेपैकी रुपये ९०,०००/- असे लाचेची रक्कम दिनांक १६/०९/२०२४ रोजी देवुन उर्वरित रक्कमेकरीता आलोसे यांनी पाठपुरावा केला असता तकारदार यांनी दिनांक २५/०९/२०२४ रोजी पर्यंत मुदत घेतली. उर्वरित रक्कमेकरीता आलोसे यांनी पाठपुरावा केला असता तकारदार यांनी दिनांक २६/०९/२०२४ रोजी ला.प्र.वि. पालघर येथे तकार केली.

तकारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये आलोसे यांनी यापुर्वी ९०,०००/- रूपये स्विकारल्याचे कबुल करून उर्वरित रक्कम तडजोडीअंती १.३०,०००/- रूपये रक्कमेची मागणी केल्याचे पडताळणीमध्ये स्पष्ट झाले व लागलीच करण्यात आलेल्या सापळा पंचनाम्या दरम्यान आलोसे क. ०१ यांना रूपये ४०,०००/- रक्कम स्विकारताना जागेवरच रंगेहाथ पकडण्यात आले असून आलोसे नं २ यांनाही
सदर गुन्हयामध्ये अटक करण्यात आले आहे.

मार्गदर्शक अधिकारी मा.श्री. सुनिल लोखंडे साो, पोलीस अधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र ठाणे मा. श्री. गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र ठाणे मा. श्री. महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणान्या लोकसेवकाबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर यांचेशी संपर्क करावा.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट