रेकॉर्डवरील आरोपीने अपहरण केलेल्या ८ वर्षाच्या अपहृरीत मुलीचा रात्रीच्या ८ तासांमध्ये वाडा पोलीसांनी लावला छडा.

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

वाडा
.दिनांक २७/०२/२०२५ रोजी महीला नामे सौ. ज्योती कमळाकर वड वय २८ वर्षे, सध्या रा. संजयगांधी नगर वाडा, ता.वाडा, जि. पालघर मुळ रा. नांदगाव पो. न्याहाळे ता.जव्हार जि. पालघर यांनी रात्रौ २१:०० वाजेच्या सुमारांस वाडा पोलीस ठाण्यात हजर राहुन माहीती दिली की, त्यांची ८ वर्ष वयाची मुलगी ही २७/०२/२०२५ रोजी संध्याकाळी ०४.०० वाजता ते संध्याकाळी ०६.०० वाजण्याचे दरम्यान संजयगांधी नगर, वाडा, ता. वाडा, जि. पालघर येथे राहते घरासमोर खेळत असतांना एक इसम याने डोक्यात सफेद रंगाची टोपी घातलेली, अंगात फुल बाहयांचा सफेद शर्ट व नेसुन काळया रंगाची पॅन्ट अशा वर्णनाचा असलेल्या इसमाने नमुद ही अल्पवयीन असल्याने माहित असताना तिस फिर्यादी यांचे कायदेशीर रखवालीतुन फुस लाऊन पळवुन नेले असलेबाबत वाडा पोलीस ठाण्यात माहीती दिली. सदरचा प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने तात्काळ वरिष्ठांना सदर घटनेची माहीती दिलीव वाडा पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी अंमलदार यांना पोलीस ठाण्यात बोलावुन त्यांना घडलेल्या माहीती देवुन अपहरीत मुलीचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या. तसेच जस संवाद अभियान अंतर्गत सर्व गृपवर अपहरीत मुलाचा फोटो व संशयरत इसमाचे वर्णनाचे मसेज पाठवुन सदर मुलीचा व संशयीत इसमाचा शोध घेणेबाबत कळविले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांनी वाडा पोलीस ठाण्यात भेट दिली. त्यांनी रात्रीची वेळ असल्याने अपहृरीत मुलीचा व आरोपीचा शोध घेणेकरीता अधिक पोलीस बळाची आवश्यकता असल्याने मा. वरिष्ठांकडे मनुष्य बळाची मागणी केली असता १ स्ट्रायकींग अशी अतिरीक्त कुमक वाडा पोलीसांचे मदतीला पाठवीली व दिलेल्या सुचनांप्रमाणे मुलीचा शोध सुरु केल.
मुलगी ज्या परिसरामध्ये खेळत होती त्या परिसरातील दुकानदार /नागरीकांना घरामधुन उठवुन विनंती केली. सी.सी.टि.व्ही. कॅमेरे चेक करुन मुलीचा शोध घेत असतांना प्रथम एक वयस्कर व्यक्ती असावा परंतु नंतर एका लहान मुलीने त्याचे नाव डेव्हीड असे सांगीतले नंतर व्हिडीओ सी.सी.टि.व्ही. प्राप्त होताच सदर इसम हा देसई येथे राहणारा गुरुनाथ ऊर्फ डेव्हीड महादु मुकणे हा असल्याचे लोकांनी ओळखले. त्याला दारुचे पिण्याचे व्यसन असुन तो गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचे लोकांनी सांगीतले. सदर घटनेचे गांभीर्य व संवेदनशिलता वाढल्याने वाडा पोलीस ठाण्याकडील दिवस रात्रचे सर्व अधिकारी/अंमलदार बोलावुन घेतले. नमुद इसम हा मुलीला घेवुन पैनशेत गावाकडे जातांना सी.सी.टि.व्ही. कैमेन्यांमध्ये दिसल्याने पैनशेत गावातील जनसंवाद अभियान गृपमधिल सदस्यांना माहीती दिली. त्यांचे गावातील तरुण होतकरु मुले व वाडा अगरआळी मधील तरुण होतकरु मुले यांना सोबत घेवुन सदर मुलीचा देसई भागात शोध घेत असतांना सदरचा इसम हा त्याचे घरी नसल्याचे आढळुन आले. त्याचा वाडा गावातील आगरआळी परिसरात, पैनशेत गावात परिसरात शोध घेत असतांना पहाटे ५ वाजेच्या सुमारांस नमुद इसम हा अपहरीत मुलीला सोबत घेवुन शास्त्रीनगर परिसरामधुन लपत छपत जातांना दिसुन आला. लागलीच पोलीसांनी त्याच्यावर झडप घालुन त्याला ताब्यात घेतले. तसेच अपहरीत मुलीला ताब्यात घेवुन पोलीस ठाण्यात आणुन तीचे आई-वडीलांच्या ताब्यात दिले आहे. सदर घटनेबाबत वाडा पोलीस ठाण्यो गु.रजि. नं ९०/२०२५ भा.न्या.सं. २०२३ कलम १३७ (२) प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास सुरु आहे.

सदरची कारवाई श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. गणपत पिंगळे, उप विभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग, यांचे मार्गदर्शानाखाली श्री. दत्तात्रय किंद्रे, पोलीस निरीक्षक, सपोनि अजित गोळे, सपोनि अजित साबळे, पोउनिरी विजय डाखोरे, पोउपनिरी/मयुरेश अंबाजी, पोउपनिरी/मयुर शेवाळे, मपोउनि सुप्रिया मांढरे, पोउपनिरी / सागर मालकर, सफौ. विलास पाटील, पो.हवा./गुरुनाथ गोतारणे, पो.हवा./विजय मढवी, पोहवा / संतोष किणी, पोहवा / संदीप माळगावी, पोहवा दिवे, चालक पोना / तुषार भरसट, पोना/ज्ञानेश्वर पवार, पोना/राजेद्र आहीरे, पोना/राहुल सांबरे, पोना/गणेश पहाड, पोना/भरत गोवारी, पो.शि./गजानन जाधव, पो.शि./ भुषण खिल्लारे, पोशि/संतोष वाकचौरे, पोशि चेतन सोनावणे, पोशि/संजय सानप, पोशि/गणेश वळवी, पोशि/
पोशि/गणेश वळवी, पोशि/अजय तांबडा, पोशि/राहुल वळवी, पोशि/बाजीराव मदगुम, पोशि/राहुल वाळके, पोशि/महेश केकान, पोशि/निलेश फडतरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट