रेकार्डवरील सराईत गुन्हेगार सज्जन जाधव यांस पिस्टल व काडतुसह पुणे युनिट २ ने केले जेरंबद..
सह संपादक -रणजित मस्के
पुणे

दिनांक १६/०७/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे युनिट २ चे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व शंकर कुंभार यांना बातमी मिळाली की डायसप्लॉट गुलटेकडी स्वारगेट पुणे येथील कॅनलाजवळ एक इसम अग्निशस्त्र घेवुन थांबलेला आहे.
मिळालेल्या बातमी प्रमाणे युनिट २ प्रमुख पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर यांना माहिती दिली. त्यांनी कायदेशीर करावाई करण्याचे आदेश दिले असता त्याप्रमाणे युनिट २ कडील सपोनि अमोल रसाळ व त्याचा स्टाफ मिळालेल्या बातमी प्रमाणे डायसप्लॉट गुलटेकडी स्वारगेट पुणे येथील कॅनल जवळून मिळालेल्या बातमी प्रमाणे संशियित इसमास ताब्यात घेवुन राव पत्ता विचारला असता, त्याने त्याचे नाव सज्जन सुनिल जाधव वय १९ वर्ष रा. डांगे चौक पिंपरी गांव पुणे मुळ रा. रेणुशीमोरा महाबळेश्वर सातारा असे सांगीतले. नमुद पथकाने मिळून आलेल्या इसमाची अंगझडती घेतली असता त्याचेकडे ५०,४००/-रु. किं चे एक सिल्व्हर रंगाचे लोखंडी पिस्टल मॅगझीनसह व एक जिवंत काडतुस मिळुन आले. त्याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि. कमांक ४४७/२०२४ भारताचा हत्याराचा कायदा कलम ३(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीस दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे. पुणे शहर श्री. पंकज देशमुख मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मागदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कढील पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, सपोनि अशिष कवठेकर, पोलीस उप-निरीक्षक नितीन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, पुष्पेंद्र चव्हाण, विनोद चव्हाण, ओम कुंभार, हनुमंत काबंळे, गणेश थोरात, विजय पवार, राहुल शिंदे, अमोल सरडे व नागेश राख यांनी केली आहे.
