सरदार वल्लभभाई पटेल यांची जंयती आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी तसेच राष्ट्रीय संकल्प दिवसानिमीत्त उतारे वाचन व राष्ट्रीय एकता दिवस शपथ कार्यक्रमाचे आयोजन संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग GAD- 49022/ 142023- GAD (DESK-29) दिनांक- 27/12/2023 शासन निर्णय तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुबंई यांचे पत्र क्र.पोमसं/36/र.व. का./(8300) शा.नि. अधिसुचना/01/2023 मुंबई दिनांक- 29/12/2023 अन्वये सन-2024 मध्ये सर्व शासकिय कार्यालयात राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ती संत व सुधारक यांची जयंती साजरी करण्यात यावी असे निर्देश आहेत.
त्या अनुषंगाने श्रीमती नंदिनी चानपुरकर, प्रभारी पोलीस उपअधिक्षक (गृह), यांचे शुभ हस्ते आज दिनांक-31 ऑक्टोंबर 2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे सरदार वल्लभभाई पटेल, यांच्या जयंती निमीत्त व श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यातिथी निमीत्त त्यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले…. तद्नंतर श्रीमती नंदिनी चानपुरकर, प्रभारी पोलीस उप-अधिक्षक (गृह), यांनी राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणुन इंदिरा गांधी यांच्या शेवटच्या भाषणातील उतारे वाचन तसेच राष्ट्रीय एकता दिवस शपथेचे वाचन करुन त्या पाठोपाठ कार्यक्रमास उपस्थित पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी शपथेचे वाचन केले…
सदर कार्यक्रमात श्रीमती नंदिनी चानपुरकर, प्रभारी पोलीस उप-अधिक्षक (गृह), यांच्यासह, पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथील पोलीस अधिकारी/अंमलदार मोठया संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com