बोकड चोरी करणाऱ्या आरोपीतांना रावणवाडी पोलीसानी केले अवघ्या काही तासात जेरबंद….

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

बोकड व चोरी करण्याकरीता वापरलेली अॅक्टीव्हा मोटार सायकल असा 56 हजारांचा मुद्देमाल हस्तगत..!

   👉 याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस ठाणे रावणवाडी येथे फिर्यादी  नामे - मंगल बाबुलालजी मस्करे,रा. मुरपार, ता. जि. गोंदिया यांनी दिनांक - 30/09/ 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता सुमारास त्यांचा मालकीचा पांढ-या रंगाचा, काळे ठिपके असलेला बोकड व इतर शेळ्या चारत असतांनी तीन इसम एका अॅक्टीव्हा मो.सा.क्रं. एम. एच.35 ए.एस. 7902 वरून रावणवाडी ते बालाघाट रस्त्यावरून पांढ-या रंगाचा बोकड कि. अंदाजे 6,000/- रूपयाचा चोरी करून घेवुन गेल्याबाबत फिर्यादीचे तक्रारीवरून दिनांक 30/09/2023 चे 17 / 44 वा. पोलीस ठाणे रावणवाडी अप.क्रं. 301/ 2023 कलम 379, 34 भा. दं. वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  मा. पोलीस अधिक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांनी ठाणेदार रावणवाडी यांना नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने तसेच सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना चोरी, घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांना गुन्ह्यात तात्काळ अटक करून गुन्हे उघड करण्याच्या अनुषंगाने तपास निर्देश सूचना दिलेल्या होत्या.

          त्या अनुषंगाने नमूद गुन्हयाचे तपासात पोलीस स्टेशन रावणवाडी येथील पोलीस पथक रवाना होउन अॅक्टीव्हा मो.सा. के. एम. एच. 35 ए.एस. 7902 चा पोलीस ठाणे परीसरात शोध घेत असतांनी तीन इसम मोटार सायकलने एक बोकड घेवुन विक्री करण्याच्या ईराद्याने फिरत असल्याची गोपनिय सुत्राकडून माहिती मिळाली असता पोलीस पथकानी तत्परतेने चोरी केलेला पांढ-या रंगाचा बोकड कि. अंदाजे 6,000/- रूपये, एक अॅक्टीव्हा मो.सा.क्रं. एम. एच. 35 ए.एस. 7902 कि. अंदाजे 50,000/- रू असा एकूण 56 हजारांचा मुद्देमालासह आरोपी नामे--- 

1) यश योगेश करोशिया वय 19 वर्ष रा. चांदणी चौक, स्टॉप जवळ काटी ह.मु. डब्लीग कॉलोनी गोंदिया

2) शक्ती आनंद कुवर वय 19 वर्ष डब्लींग ग्राउंड गौतम नगर गोंदिया व

3) विधिसंघर्ष बालक नामे- सागर रज्जु मोगरे रा. काली मंदीर जवळ सिव्हिल लाईन गोंदिया यांना दिनांक 30 / 09 / 2023 चे 22/57 वा. मौजा- शिरपूर येथून ताब्यात घेण्यात आले… सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार अरविंद चौधरी पो.स्टे. रावणवाडी हे करित आहेत.

   सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक, गोंदिया श्री.निखील पिंगळे सा., मा.अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर सा. मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्री. संकेत देवळेकर सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रावणवाडी चे ठाणेदार पो. नि. श्री. पुरूषोत्तम अहेरकर, पो. हवा. रंजित बघेले, सुबोध बिसेन, पो.ना. मलेवार यांनी  केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट