रसायनी पोलीस ठाणे व अभिजित पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विदयमाने बागेची वाडी ( सारसई)जि. प शाळेत दिवाळी निमित्ताने खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी-रणजित मस्के
रायगड: समाजउपयोगी कार्यक्रमात अग्रेसर असणाऱ्या रसायनी पोलीस ठाणे व अभिजित पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्ताने खाऊ वाटप कार्यक्रम साजरा करण्यात आला. रसायनी पोलीस ठाणे येथील नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक श्री अश्वनाथ खेडकर साहेब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या समस्यां जाणून घेतल्या. मध्य रेल्वे चे केंद्रीय सल्लागार श्री अभिजित पाटील यांच्या मित्र मंडळाच्या वतीने मोलाचं सहकार्य करण्यात आलं.



रायगड – अलिबाग यांच्या संकल्पनेतुन विद्यार्थी शिक्षक,तसेच पोलीस काका व पोलीस दिदी या संकल्पने अंतर्गत विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक माहिती ,बालकाविषयीचे कायदे विषयक माहिती, देण्यात आली. रसायनी पोलिस ठाणे कढिल पोलीस दीदी व पोलीसकाका यांचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले तसेच शाळेतील 70 विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्ताने खाऊ वाटप करण्यात आल्या.
सदरील कार्यक्रमा करता, पोलीस नाईक श्री विशाल झावरे साहेब ,पोलीस सेवा संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव गणेश थोरवे , शिक्षक शाळेतील चेअरमन श्री. संतोष शिंगांडे ,समाजसेवक स्वप्नील भोवड , उद्योगपती मिथुन साळुंखे , कुणाल शिंगाडे ,शाळेचे शिक्षक राजेश भोवड सर , नागनाथ चव्हाण सर आदी ग्रामस्थ व विद्यार्थी हजर होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com