निलजी येथील जबरी चोरी करुन बलात्कार केलेला गुन्हा उघड १ आरोपी जेरंबद..

उपसंपादक-रणजित मस्के
मिरज :-पोलीस स्टेशन
फिर्यादी नाय
मिरज ग्रामीण पोलीस ठाणे
गु.र.नं.३५९/२०२४, बी. एन. एस. २०२३ फलम ६४, ७०(१), ३०९(३), ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे.
माहिती कशी प्राप्त झाली
सपोफी / अनिल ऐनापुरे
दि. २६/०७/२०२४ रोजी रात्री १०.३० वा चे सुमारास
ता. २७/०७/२०२४ रोजी १९.२५ वा.
पोहेकों / १६७० संकेत मगदूम,
पोहेकौं / ५२९ इम्रान मुल्ला पोना / १८७ सोमनाथ गुंडे
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर,
मा. संदीप पुगे, पोलीस अधीक्षक, सांगली. मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली.
मा. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज उपविभाग, मिरज यांचे मार्गर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे,
सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा,
सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, स्था. मु. अ. शाखा,
महिला सहा पोलीस निरीक्षक रुपाली बोचडे, सायबर पोलीस ठाणे,
सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहेकों/ अमोल ऐदाळे, संकेत मगदुम, इम्रान मुल्ला, अमोल लोहार, आमसिध्द खोत, कुबेर खोत, पोना / सोमनाथ मुंडे, अनंत कुडाळकर, श्रीधर बागडी, पोशि/ अजय बेंदरे, रोहन धरते, सोमनाथ पतंगे, अभिजीत ठाणेकर, सुनिल जाधव, चापोहेकों / शिवाजीराव सिद, चापोशिक्र. सुशांत चिले, स्था. गु. अ. शाखा
पोहेकों / करण परदेशी, पोशि / अजय पाटील, विवेक सांळुखे, कैप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणे.
अटक वेळ दिनांक दि. २१/०८/२०२४ रोजी
आरोपीचे नांव पत्ता
गजपती शिसफुल भोसले, वय ३० वर्षे, रा. आंबेडकर नगर, बोलपाड, ता. मिरज, जि. सांगली.
उघड गुन्हे १. मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. ३५१/२०२४, बी.एन. एस.२०२३ कलम ६४, ७०(१), ३०१(३), ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे.गुन्हयाची थोडक्यात हकीकत
दि. २६/०७/२०२४ रोजी जुना हरीपुर रोड, निलजी येथे फिर्यादी हे परामध्ये त्यांचे पतीसोबत झोपली असताना रात्री १०.३० वा चे सुमारास संशयीत ४ इसमांनी फिर्यादी यांचे राहते घरामध्ये जबरदस्ती प्रवेश करून त्यांना मारहाण करून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून यातील एका आरोपीने फिर्यादी यांचेवर जबरदस्तीने बलात्कार केला असल्याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणेस वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांनी सदर घटनेबाबत माहिती घेवून सदर गुन्हा उघडीस आण्णण्याबायत वेळोवेळी मार्गदर्शन करून सुचना दिल्या. तसेच मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली व प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज उपविभाग, मिरज यांनी घटनास्थळी भेटी देवून सदर गुन्हा उघडकीस आणणेकरीता वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांची पथके तयार करुन सदरचा गुन्हा करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांना ताब्यात घेण्याचाचत आदेशीत केले होते.
त्या अनुशंगाने दि. २१/०८/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत व सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकातील सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहेकों/ संकेत मगदूम, पोहेकों। इसान मुल्ला आणि पोना सोमनाथ गुंडे यांना तांत्रीक तपास व मिळालेल्या पातमीच्या आधारे माहिती मिळाली की, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील निलजी गावात जबरी चोरी करुन बलात्कार केलेल्या गुन्हयातील आरोपी नामे गजपती भोसले हा लिगंजुर ते बैंळकी गावाकडे जाणारे रोडवर फिरत आहे.
नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, लिगंनूर ते बैंळकी गावाकडे जाणारे रोडवरील जलसंपदा कार्यालयाचे बाहेर सापळा लावून थांबले असता, एक इसम संशयीतरित्या फिरताना दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने पोलीस पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात पेवून त्याचे नाव व गाव विचारले असता, त्यांने त्याचे नाव गजपती शिसफुल भोसले, वय ३० वर्षे, रा. आंबेडकर नगर, बोलवाड, ता. मिरज, जि. सांगली असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे सपोनि नितीन सावंत यांनी निलजी येथे केलेल्या जबरी चोरीच्या गुन्हयाबाबत विचारणा केली असता, त्याने सदर गुन्हा हा त्याचे अन्य साथीदारासोबत फेला असल्याची कबुली दिली.
गजपती भोसले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. ४५२/२०२३, भा.द.वि.स.कलम ३०२ अन्वये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याची माहिती मिळाली.
लागलीच सदर आरोपीस पुढील तपास कामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com