लग्नाचे आमिष अल्पवयीन मुलीवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार आरोपी गजाआड…

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:-महाड तालुक्यातील घटना,, पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
महाड तालुक्यामध्ये दिवसेंदिवस गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याच्या घटनेची संख्या जास्त आहे. महाड तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.

वैभव भूपेंद्र पवार असे आरोपीचे नाव असून महाड शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असून सुद्धा त्या मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन व तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने आरोपीने बलात्कार केला आहे.
आरोपी याने थम्सअप मध्ये वाईन मिक्स करून पिडीतेला पिण्यास देऊन तिच्यावर अत्याचार केल्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली आहे.
तसेच पीडितेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अतिप्रसंग देखील आरोपी याने केले आहेत. महाड शहर पोलीस ठाणे येथे संबंधित आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com