रांगोळी येथील सामाजिक कार्यकर्त्याचे अपहरण करुन त्याचा खुन करणारी सराईत टोळी स्था. गुन्हे शाखा, कोल्हापूर यांनी केली जेरबंद

सह संपादक -रणजित मस्के
कोल्हापूर

मा. पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार साो यांनी गुन्हे परिषद बैठकीवेळी तसेच वेळोवेळी बेपत्ता तसेच खुनाचे गुन्हयातील आरोपी याचा शोध घेवुन त्यांचेवर कडक कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे
मा. पोलीस अधीक्षक साो, यांनी दिले आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस पथक तयार करुन जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडील मिसींग व्यकती बाबत माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, शिवाजीनगर पोलीस ठाणे कडील मिसींग रजिस्टर १०/२०२५ मधील मिसींग इसम नामे लखन आण्णाप्पा बेनाडे वय ३६ रा रांगोळी ता हातकणंगले जि कोल्हापूर याचा विशाल घस्ते रा तामगाव ता करवीर याने व त्याचे साथीदारांनी अपहरण केले आहे. अशी गोपनिय खात्रीशिर माहिती मिळाली. मिळाले माहितीचे अनुषंगाने तसेच सदर घटनेचे गांभीर्य पाहुन मा. पोलीस अधीक्षक साो यांनी रविंद्र कळमकर पोलीस निरीक्षक यांना तसेच पोसई संतोष गळवे व त्याचे पथकासह विशाल गस्ते व त्याचे साथीदारांचा कोल्हापूर शहर व आजु बाजुचे पसिरात शोध घेण्यास सांगीतले.
अपहरीत इसमाचा शोध घेत असताना विशाल गस्ते हा उजळाईवाडी येथील अर्जेंट कार वॉश सेटर येथे मिळुन आला त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे लखन बेनाडे या मिसींग इसमाबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेवुन त्याचेकडे अधिक कसुन चौकशी केली असता विशाल घस्ते याने सांगीतले की, तो गेल्या दोन वर्षापुर्वी राजारामपुरी पोलीस ठाणेच्या गुन्हयामध्ये अटक होवुन जेल मध्ये होता. त्यावेळी त्याची पत्नी लक्ष्मी ही लखन बेनाडे याचेकडे बचत गटाचे कर्ज मागणी साठी गेली होती त्यावेळी तिला कर्जाची गरज होती म्हणुन लखन बेनाडे याने तिचा गैर फायदा घेवुन तिचेशी शरीर संबंध ठेवले होते व त्याचे व्हीडीओ करुन ते प्रसारीत करणेची धमकी देवुन तिला मानसिक व शारीरीक त्रास देत होता. व पत्नी लक्ष्मी हीस आपले घरी ठेवुन घेतले होते, तेव्हा पासुन ती लखन बेनाडे हीचे घरी राहत होती, मी जेल मधुन बाहेर आल्यानंतर लक्ष्मी ही लखन बेनाडे याचे घरातुन पळुन येवुन ती राजेंद्रनगर येथे राहत होती. त्यानंतर सुध्दा लखन बेनाडे हा विशाल घस्ते व त्याची पत्नी लक्ष्मी हिचे विरुध्द वेगवेगळया पोलीस ठाणेस तक्रारी देवुन मानसिक व शारीरीक त्रास देत होता.
दि.१०.०७.२०२५ रोजी लखन बेनाडे हा शाहुपुरी येथे आला होता. त्याने पत्नी लक्ष्मी हीस फोन करुन मी तुमच्या विरुध्द दिलेलया तक्रारी मागे घेतो तु माझे बरोबर चल असे म्हणुन बोलाविले होते, त्याच वेळी लक्ष्मी हिने फोन करुन विशाल घस्ते यास बोलाविले. विशाल घस्ते हा त्याठिकाणी आला असता लखन बेनाडे याने लक्ष्मी हिस मारहाण केली व तेथुन निघुन गेला होता. त्यानंतर विशाल घस्ते व त्याची पत्नी लक्ष्मी असे राजेंद्रनगर येथे निघाले होते त्यावेळी लखन बेनाडे हा सायबर चौक येथे आला होता त्यावेळी लक्ष्मी हिने
विशाल घस्ते यास लखन बेनाडे यास ठार मारुया असे सांगीतलेने विशाल घस्ते याने त्याचे साथीदार नामे आकाश उर्फ माया दिपक घस्ते, वय २१रा. तामगाव ता करवीर कोल्हापूर, संस्कार महादेव सावर्डे, वय २० रा देवाळे ता करवीर कोल्हापूर, अजित उदय चुडेकर, वय २९ रा. राजकपुर पुतळा जुना वाशी नाका कोल्हापूर यांनी लखन बेनाडे याचा सायबर चौक येथुन त्याचे तवेरा कारमधुन पाठलाग सुरु केला. पाठलाग करुन त्यास शाहु टोल नाका येथे जबरदस्तीने तवेरा या गाडीमध्ये घालुन हायवेला नेले तेथुन त्याला सकेश्वर या गावाचे हददीमधील नदीजवळ नेले. नदीजवळ आलेनंतर लखन बेनाडे याला गाडीतुन खाली घेवुन नदीकाठाला जावुन त्याचे हात पाय तोडुन त्याचे मुंडके शरीरापासुन वेगळे केले व ते पोत्यामध्ये घालुन नदीमध्ये फेकुन दिले आहे. अशी हकीकत सांगीतली. त्यानंतर गुन्हयातील इतर साथीदार नामे पत्नी लक्ष्मी विशाल घस्ते वय ३६ रा राजेंद्रनगर, आकाश उर्फ माया दिपक घस्ते, वय २१रा. तामगाव ता करवीर कोल्हापूर, संस्कार महादेव सावर्डे, वय २० रा देवाळे ता करवीर कोल्हापूर, अजित उदय चुडेकर, वय २९ रा.राजकपुर पुतळा जुना वाशी नाका कोल्हापूर यांना ताब्यात घेतले त्यांनी देखील गुन्हा केलेचे कबुल केले.
विशाल घस्ते व त्याचे साथीदारांनी खुनाची कबुली दिलेनंतर मयत इसम नामे लखन आण्णाप्पा बेनाडे वय ३६ रा रांगोळी ता हातकंणगले जि कोल्हापूर याची बहिण सौ निता उमाजी तडाखे वय ३५ व्यवसाय गृहिणी रा.आवळे गल्ली इंचलकरंजी ता हातकंणगले जि कोल्हापूर मोबाईल ७७०९९३१२२४ हिने गावभाग पोलीस ठाणे इंचलकरंजी येथे हजर राहुन विशाल घस्ते व त्याचे साथीदाराचे विरुध्द तक्रार दिलेने त्याचे विरुध्द अपहरण, खुन, खुनाचा कट रचणे, खुन करुन पुरावा नष्ट करणे या कलमांन्वये गुन्हा नोंद करणेत आला आहे त्यानंतर सदरचा खुनाचा गुन्हा हा राजारामपुरी पोलीस ठाणे येथे वर्ग करणेत आला असुन गुन्हयाचा अधिक तपास राजारामपुरी पोलीस ठाणेचे अधिकारी करीत आहेत.
सदरचे आरोपी क्रमांक १ विशाल बाबुराव घस्ते वय ४५रा तामगाव ता करवीर जि कोल्हापूर हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याच्यावर चोरी व मारामारीचे एकुण १९ गुन्हे दाखल आहेत. आरोपी नं. ०२ आकाश उर्फ माया दिपक घस्ते वय २२ रा नवशा मारुती मंदीर जवळ राजारामपुरी कोल्हापूर याचे विरुध्द जबरीचारी, खुन, दरोडा यासारखे एकुण ०५ गुन्हे दाखल आहेत. आरोपी नं. ०३ अजय उदय चुडेकर रा राजकपुर पुतळा जुना वाशीनाका कोल्हापूर याचे विरध्द महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम अंतर्गत ०१ गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री योगेश कुमार, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोसई संतोष गळवे, तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, योगेश गोसावी, राजु कांबळे, संतोष बरगे, प्रदीप पाटील, शिवानंद मठपती, विलास किरोळकर, अमित सर्जे, महादेव कु-हाडे, हंबीरराव अतिग्रे, अरविंद पाटील,, सायली कुलकर्णी डिसोजा यांनी केली आहे