सातारा पोलिसांची दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी करावयाच्या कार्यपद्धतीची रंगीत तालिम…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- मा. अपर पोलीस महासंचालक सो, कायदा व सुव्यवस्था, म.रा.मुंबई यांचे आदेशानुसार व श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक २०/०१/२०२३ रोजी सातारा शहरातील विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांचे कार्यालयाचे अधिनस्त असलेल्या सेव्हन स्टार या मॉलचे पार्किंगमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी करावयाच्या कार्यपद्धतीची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) दहशतवाद विरोधी शाखा सातारा या शाखेमार्फत आयोजित करण्यात आली होती.

दुपारी १५.४१ वा. सदरचे मॉलचे पार्किंगमध्ये बेवारस वस्तु असलेली बॅग व त्यामध्ये बॉम्बसदृष्य वस्तु

असल्याबाबतचा दूरध्वनी पोलीस नियंत्रण कक्ष, सातारा येथे आला. तदनंतर पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकारी यांनी

तात्काळ सातारा शहर पोलीस ठाणे, शाहूपुरी पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, शहर वाहतूक नियंत्रण शाखा,

दहशतवाद विरोधी शाखा, बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक, जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा, फिंगर प्रिंट,

वायरलेस विभाग, मुख्यालयातील आरसीपी पथक, मोटार परिवहन विभागाकडील वाहने, फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका

यांना तात्काळ घटनास्थळी पाचारण केले.

त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्वान पथकाचे अधिकारी व पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळी हजर असलेले सातारा शहर व शाहुपुरी पोलीस ठाणेचे अधिकारी, पोलीस मुख्यालयातील आरसीपी पथकाच्या मदतीने सदरचे घटनास्थळ निर्मनुष्य करून बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्वान पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी सदर बॅगेची MOS या (स्फोटक पदार्थ शोधक मशिन) व नाक एक्सरे मशिन या उपकरणामार्फत तपासणी केली असता सदर बँगेत बॉम्ब सदृश्य वस्तु मिळाल्याने सदरची संशयीत रंकरचे सहाय्याने सुरक्षितरित्या छोटया ट्रॉलीमार्फत पाचटनी वाहनात सुरक्षित व निर्मनुष्य ठिकाणी पोलीस परेड ग्राऊंड येथे संशयित बॅग नाश करण्यात आली. त्यानंतर दहशतवाद विरोधी शाखेचे सपोनि एस. एस. साळुंके यांनी सदरची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) ही वरिष्ठांच्या आदेशानुसार घेतली असल्याचे पोलीस नियंत्रण कक्ष सातारा येथे कळविले.

सदर रंगीत तालीम (मॉक ड्रिल) ही श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद हल्ल्याप्रसंगी करावयाच्या उपाययोजनांबाबतची रंगीत तालीम योग्य रितीने राबविण्यात आली. यामध्ये दहशतवाद विरोधी शाखा, सातारा व बॉम्ब शोधक व नाशक पथक यांचेसह सातारा शहर, शाहुपुरी, सातारा शहर वानिशा, जिवानिशा व पोलीस मुख्यालयातील एकुण १२ अधिकारी व ६४ अंमलदारांनी सहभाग घेतला. सदरची रंगीत तालीम दुपारी १५.४१ वा सुरू करून १६.५० वा संपन्न करण्यात आली. सदरची रंगीत तालीम शांततेत पार पडली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट