रामनगर पोलीसांनी कुडवा गोंदिया येथे जुन्या उधारीच्या पैशाच्या वादावरून युवकाचा घातक हत्याराने निर्घृण खून करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या. ..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, तक्रारदार – प्रवीण उर्फ लक्की राजकुमार मेश्राम, राहणार- आंबेडकर चौक, वार्ड क्रमांक- 3 कुडवा, गोंदिया यांनी पोलीस स्टेशन रामनगर येथे तक्रार दिली की तक्रारदार स्वतः, व त्याचा मृतक मित्र – मनीष भालाधरे आणि मित्र राहुल बरेले असे तिघे सिगरेट पिण्याकरिता आरोपी इसम नामे- संतोष मानकर यांचे लकी रेस्टॉरंट एम.आय.टी.कॉलेज समोर कुडवा येथे गेले असताना या तिघांचा मित्र- प्रवेश मेश्राम, याच्या जुन्या उधारीच्या पैशावरून वाद झाला असता दिनांक 6-01-2024 चे रात्रौ 20.00 वाजता दरम्यान आरोपी नामे – संतोष मानकर यांनी तक्रारदार, मृतक-मनीष आणि राहुल बरेले यांचे सोबत भांडण शिवीगाळ करून मिरची पावडर मृतकाचे डोळ्यावर फेकून आरोपी नामे- 1) संतोष रामेश्वर मानकर 2) लकी उर्फ लोकेश संतोष मानकर 3) पवन संतोष मानकर 4) जॉर्डन उर्फ मोहित शेंडे आणि विधीसंघर्ष-ग्रस्त बालक असे सर्व राहणार कुडवा यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून लोखंडी रॉड, कुऱ्हाड, कोयता इत्यादी घातक हत्याराने मृतक- मनीष उर्फ ईश्वर भालाधरे वय 30 वर्षे राहणार -आंबेडकर चौक, कुडवा, यास जिवानिशी ठार करून निर्घृण खून केला आहे.

अश्या तक्रारदार यांचे तक्रारी वरुन पोलीस ठाणे रामनगर येथे अपराध क्रमांक -09/2024 कलम 302, 323, 143, 147, 148, 149, 504 भारतीय दंड विधान संहिता अन्वये दाखल करण्यात आलेला असून तपासात आहे…. सदर गुन्ह्याचा तपास स.पो.नि. राजू बस्तवाडे पोलीस ठाणे रामनगर करीत आहेत….

        पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा,  उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. प्रमोद मडामे, यांचे निर्देश सुचना प्रमाणे व मार्गदर्शनाखाली सदरचे खून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यातील आरोपीतांचा शोध घेण्याकरीता पोलीस ठाणे रामनगर, स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळी पथके नेमण्यात येवून यातील आरोपी क्रमांक 1 ते 3 आणि एका विधीसंघर्ष -ग्रस्त बालक यांना अवघ्या काही तासात ताब्यात घेण्यात आलेले आहे. तर एकाचा शोध घेण्यात येत आहे.....  ताब्यात घेण्यात आलेल्या 1 ते 3 आरोपी यांना गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपूस अंती गुन्ह्यात अटक प्रक्रिया करण्यात येत आहे....

        माननीय वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली नमूद गुन्ह्यातील आरोपी 1 ते 3 आणि विधीसंघर्षग्रस्त बालक यांना अवघ्या काही तासात शोध घेवून ताब्यात  घेण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री. दिनेश लबडे यांचे नेतृत्वातील दोन पथकातील पोलीस अधिकारी - अंमलदार - स.पो.नी. विजय शिंदे, स.फौ. अर्जुन कावळे, राजू मिश्रा, भुवनलाल देशमुख, महेश मेहर, सुजित हलमारे, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, सोमेन्द्र तुरकर, रियाज शेख, विठ्ठलप्रसाद ठाकरे, इंद्रजीत बिसेन, अजय रांहांगडाले, हंसराज भांडारकर, संतोष केदार लक्ष्मण बंजार, घनश्याम कुंभलवार, मुरली पांडे, तसेच पोलीस ठाणे रामनगर चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे , यांचे मार्गदर्शनातील पथक सपोनी राजू बस्तवाडे, पोलीस अमलदार  राजू भगत, राजू भुरे , सुनील चव्हाण, अरुण उके, कपिल नागपुरे आणि सायबर सेलचे दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे, संजू मारवाडे, यांनी अथक परिश्रम मेहनत घेवून कामगिरी बजावलेली आहे..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट