अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या तीन इसमांविरुद्ध पो. स्टे. रामनगर पोलिसांची कारवाई….. गुन्हा नोंद..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- 🎯 मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, यांनी छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना त्यांचे पोलीस ठाणे हद्दीत चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी यासारखे व इतर अवैध धंदे, यांचेवर धाडी घालून प्रभावी कारवाई करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते.
या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाविरूद्ध सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदयावर, छापे टाकून धडक कारवाई करण्यात येत आहे.
या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, श्री. अशोक बनकर यांचे आदेश व निर्देशाप्रमाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया, श्री. ताजने सा, पो.नि. श्री. संदेश केन्जले यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पो.स्टे. परिसरातील अवैध धंद्याविरुद्ध व गुन्हेगारी प्रवूत्तीच्या इसमांविरूद्ध कारवाईची मोहीम
राबविण्यात येत आहे .
या अनुषंगाने पो.स्टे. रामनगर येथील पो.हवा.राजेश भुरे ब.न.606 यांनी दिनांक 06-11 -2023 चे 10.00 वाजता दरम्यान प्रो.रेड./जुगार रेड पेट्रोलिंग करिता रवाना झालो असता गोपनीय माहिती मिळाली की कटगीटोला ते गोंडीटोला रोडने एक इसम व मोहफुलाची हा.भ.दारू बाळगून विक्रीकरिता वाहतूक करीत असल्याचे खबरेवर पो.स्टॉप व पंचासह सापळा रचून इसम नामे रजत भजनलाल गेडाम वय 29 वर्षे राहणार आसोली यास पकडून पंचासंमक्ष मोसा क्रमांक MH 35 AQ 5544 ची झडती घेतली असता त्याच्या मोसाचे समोरील फुटरेस्टवर व डिकीत एकूण 45 लिटर हा.भ. दारू किमती 9000/-रुपये व मोसा क्रमांक MH 35 AQ 5544 किमती 90000/- रुपये असा एकूण 99000/-रू चा मालं मिळून आल्याने कलम 65 (अ)(ई)म.दा. का. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पो हवा फुलबांधे ३२० पो.स्टे. रामनगर हे करीत आहेत.
तसेच पोहवा राजेश भुरे/606 रामनगर यांनी लेखी रिपोर्ट दिली की दिनांक 7/11/2023 चे 10.00 वाजता दरम्यान प्रो रेड/जुगार रेड पेट्रोलिंग करिता रवाना झालो असता गोपनीय माहिती मिळाली की कटंगीटोला ते गोंडीटोला जाणाऱ्या रोडने एक इसम जांभळ्या रंगाची स्कुटीने मोहाफुलाची हा. भ. दारू बाळगून विक्रीकरिता वाहतूक करीत असल्याच्या खबरेवर पो. स्टाफ व पंचासह सापळा रचून कटंगीटोला खर्डा फॅक्टरीजवळ त्यास पकडण्यात आले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यानी त्याचे नाव संघर्ष सूदेश गडपायले वय 22 वर्षे राहणार आसोली ता. जि. गोंदिया याचे मोसा. क्र. MH 35 AT 6948 ची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या मोसाचे फुटरेस्टवर 35 लिटर मोहाफुलाची हा.भ. दारू किमती 7000/- रुपये व मोसा क्र. MH 35 AT 6948 किमती 90000/- रुपये असा एकूण 97000/- रुपयाचा माल मिळून आल्याने कलम 65 (अ)(ई) म. दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.हवा. सुनीलसिंह चौव्हान/295 हे करीत आहेत.
तसेच पो.हवा. छत्रपाल फुलबांधे/320 पो.स्टे. रामनगर यांनी लेखी रिपोर्ट दिली की दिनांक 08/11/2023 चे 13.00 वाजता दरम्यान प्रो रेड व जुगार रेड पेट्रोलिंग करिता रवाना झालो असता गोपनीय माहिती मिळाली की हॉटेल तडका समोरील जाणाऱ्या रोडने एक इसम पांढऱ्या रंगाच्या स्कुटीने देशी दारू बाळगून विक्रीकरिता वाहतूक करीत असल्याचे खबरेवर पो.स्टाफ व पंचासह सापळा रचून हॉटेल तडकाजवळ त्यास पकडण्यात आले त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संतोष गणेश चौधरी वय 53 वर्ष राहणार छोटा गोंदिया, माता मंदिर जवळ असे सांगितले. त्याचे मोसा क्रमांक MH 35 AF 6453 ची पंचासमक्ष झडती घेतली असता समोरील फूटरेस्टवर एका कापडी थैल्यात (1) देशी दारू फिरकी संत्री 90 ml चे 100 नग प्रत्येकी 35/- रुपये प्रमाणे किमती 3500/- रुपये चा माल (2) देशी दारू सेवन स्टार पंच 90 ml चे 100 नग किमती 35/- रुपये प्रमाणे 3500/- रुपये चा माल (3) एक मोसा MH 35 AF 6948 किमती 50,000/- रुपये असा एकूण 57000/- रुपये चा माल मिळून आल्याने कलम 65 (अ)(ई),77 (अ) म. दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पो. हवा. सुनीलसिंह चौव्हाण/ 295 हे करीत आहे...
सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनात सपोनी. राजू बस्तवाडे, पो.उप. नि. सुशील सोनवणे, पो. हवा. राजेश भुरे/606, पो.हवा. सुनिलसिंह चौव्हान/295, पो.हवा. छत्रपाल फुलबांधे/320, पो.ना. बाळकृष्ण राऊत/1538, पो. शि. कपिल नागपुरे/ 2091 यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com