रिक्षात हरवलेली 2 लाख 50 हजारचे दागिने परत मिळवून देण्यात मानपाडा पोलीसाना यश..

सह संपादक – रणजित मस्के
मानपाडा :


दिनांक 29 /04/ 2025 रोजी तक्रारदार लक्ष्मी गुप्ता हे त्यांचे परिवारासह रिक्षाने प्रवास करीत असताना. प्रवासादरम्यान त्यांची 2 लाख 50 हजार रुपये सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग रिक्षात विसरल्याने तेव्हा त्यांनी त्याबाबत मानपाडा पोलीस स्टेशन डोंबिवली पूर्व येथे आल्याने मा. वपोनि विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी API श्री संपत फडोळ व PSI गणेश भाबड यांनी लागलीच तपास पथकातील पो.हवा. विकास माळी HC सुनील पवार HC संजू मासाड HC शिरीष पाटील PC अशोक आहेर PC विजय आव्हाड PC सोपान शेडके यांना CCTV फुटेज पाहणीसाठी रवाना केले तसेच तांत्रिक पद्धतीने रिक्षाचा शोध घेऊन रिक्षा चालक यांनी सदर हरवलेली मौल्यवान दागिन्याची बॅग सुखरूप परत मिळून दिली आहे.