राज्य विद्युत महामंडळ कर्मचारी संपात महाड युनिटची देखील हजेरी…
प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड: शासनाने महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्य वीज वितरणाचा समांतर परवाना अदानी ग्रुपच्या खाजगी संस्थेला देण्याचा जो घाट घातला आहे त्या विरोधात राज्यभरातील विद्युत महामंडळ कर्मचाऱ्यांनी मंगळवार 3 जानेवारी रोजी रात्री 12 वाजलेपासून 72 तासांचा राज्यव्यापी संप पुकारला आहे.
या संपामध्ये विविध अशा 30 कामगार संघटनांनी सहभाग घेतला असून जवळजवळ एक लाखाहून अधिक कर्मचारी या संपात सामील झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
महाड येथील वीज कर्मचाऱ्यांनी देखील या संपामध्ये सहभाग घेऊन शासनाविरोधात तसेच अदानी विरोधात जोरदार घोषणाबाजी करून या खाजगीकरणाच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला.
यावेळी कामगार महासंघ, वर्कर्स फेडरेशन, तांत्रिक कर्मचारी संघटना, मागासवर्गीय संघटना, इंजिनियर्स असोसिएशन या सर्व संघटनेतील कर्मचारी मोठ्या संख्येने सामील झाले होते.
यावेळी भांडूप झोनचे संघटक श्री सतीश चिनके, श्री प्रभाकर काळीजकर, काशिनाथ शिंदे,सौ.स्मृती खातू,अमित कदम,अनिल भोई,जे.डी.देसाई यांच्यासह पुरुष व महिला कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने सामील झाला होता.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com