राजकुमार कारंडे यांची आज निवृत्तीपोलीसांच्या ‘आठ’ तास ड्युटीत विशेष योगदान…

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई :- मुंबईसह राज्यभरातील पोलिसांना ८ तासांची ड्यूटी करावी. कमी मनुष्यबळातही ही ड्यूटी यशस्वी होऊ शकते अशी खूणगाठ बांधून या’ आठ तास ड्यूटी’ योजनेत योगदान देणारे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार कारंडे (३० सप्टेंबर) पोलीस दलाच्या सेवेतून निवृत्त होत आहेत. ते सध्या गोवंडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. ५ मे २०१६ रोजी देवनार पोलीस ठाण्यातून पोलिसांच्या ८ तास ड्युटीला सुरुवात झाली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी ही ड्यूटी सुरू केली होती. मात्र या ड्यूटीसाठीचा अहवाल हा देवनार पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तयार केला होता. त्यात शिपाई रवींद्र पाटील, उपनिरीक्षक शिवाजी पालवे, पोलीस हवालदार राजकुमार कारंडे, रवींद्र पाटील यांनी ८ तास ड्यूटी बाबतचा तब्बल ७३ पानांचा अहवाल तयार करून तो तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडलगिकर यांना सादर केला होता.

कुस्तीत वाढलेले राजकुमार कारंडे ऐतिहासिक ८ तास योजने मधील महत्वाचे सदस्य आहेत. त्यावेळीं देवनार पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई रवींद्र पाटील यांनी ८ तास कर्तव्याचा ७३ पानी अहवाल पोलीस आयुक्तांना सादर केल्यानंतर त्यावर ८ तास समिती गठन करण्यात आली होती. त्यात पोलीस ड्यूटी बाबतच्या सर्वेची जबाबदारी राजकुमार कारंडे, पालवे, स्नेहा सावंत, युवराज पाटील, महिला पोलीस पोलीस नाईक स्नेहा सावंत ही टीम होती ज्योतजा टांगट यांच्यावर होती.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com