रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महामुंबई विभागातर्फे||एकमेका सहाय्य करू,अवघें धरू सुपंथ|| या उक्तीनुसार विविध कार्यक्रमाचे आयोजन संपन्न..

उपसंपादक-रणजित मस्के
अलिबाग:-संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या वचनास स्मरून रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, सेवाश्रम सामाजिक विकास संस्था तसेच कलाविश्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने
रविवार दिनांक १० मार्च, २०२४ रोजी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पेढांबे समाज मंदिर, वाघ्रण, अलिबाग, जिल्हा रायगड येथे श्री शंभूराजेंचा इतिहास कथन, लहान मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप तसेच महिला आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.


सदर उपक्रमास मा. श्री. अमोल शिंदे दिवाणी न्यायाधीश, जिल्हा विधी प्राधिकरण सेवा चे सचिव, भारत भूषण सन्मानित तेजस्विनी फाउंडेशनच्या अध्यक्षा मा. ॲड. श्रीमती जिविता पाटील हे प्रमुख पाहुणे लाभले तसेच त्यांचे सह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमात लहान मुलं तसेच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कु. श्रावणी आणि कु. श्लोक मारळे यांचे वतीने शैक्षणिक साहित्य व कु. श्रीमयी आणि श्री. अजिंक्य पाटील यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.


सदर उपक्रम हा सेवाश्रम सामाजिक विकास संस्थे चे अध्यक्ष मा. श्री. दिपक पाटील, तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष, मा. श्री. रुपेश पाटील, कला विश्व फाउंडेशन चे अध्यक्ष मा. श्री. प्रणित पाटील तसेच रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे शितलताई लाडके, पल्लवीताई पाटील, श्री. सुजित दादा पाटील, समीक्षा ताई गावडे, परिनिता ताई सोमपूरकर, नितीन दादा सोमपूरकर, कु. श्रीमयी लाडके तसेच मा. पारस दादा पाटील या सर्वांच्या योगदानातून यशस्वीपणे पार पडला.
||अखंड सेवेची ठायी तत्पर||
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान
महाराष्ट्र राज्य
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com