रेल्वे प्रवासी यांच्या बॅगेमधून सोन्याचे दागिने तसेच मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून पालघर लोह पोलिसांची उल्लेखनिय कामगिरी..!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर :- दिनांक. 10/02/2025 पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे लोहमार्ग मुंबई पोलीस आयुक्तालय यांची उल्लेखनिय कामगिरी रेल्वे प्रवासी यांच्या बॅगमधुन सोन्याचे दागीने तसेच मोबाईल फोन चोरी करणा-या आरोपीस अटक करुन गुन्हे उघडकीस आणले.


पालघर रेल्वे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेवुन त्यांच्याजवळ असलेली बॅगेची चैन खोलुन, मोबाईल फोन, दागीने इत्यादी मौल्यवान चिजवस्तु चोरत असलेल्या आरोपींवर पाळत ठेवुन वारंवार घडत असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी वेळोवेळी विविध रेल्वे स्टेशनवर नागरी वेषात सापळा लावुन नमुद दोन आरोपी यांना रंगेहात पकडुन त्यांचेकडे सखोल तपास केला असता, पालघर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एकुण 05 गुन्ह्यांची उकल करुन रु. 1,041,720/- किंमतीचे चोरीस गेलेले दागीने व रु. 73,188/- किंमतीचे चोरीस गेलेले मोबाईल फोन असे एकुण रु. 11,14,908/-रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपी:- 01) दिपक उर्फ विश्वास उध्दव काळे वय-37 वर्षे, राहणार राहणार रुम नं. 406, विर 2, उमरोळी पुर्व ता. वसई जि. पालघर मुळ गाव मु.पो. वर्कटनी ता. करमाळा जि. सोलापुर आ.क्र.8268 7302 0321.

02) उमेश बाळा काळे वय 22 वर्षे राहणार साई बिल्डींग, नवली तलावाच्या जवळ, नवली पालघर पुर्व मुळ गाव मु.पो. वर्कटनी ता. करमाळा जि. सोलापुर आ.नं. 8353 3840 6904.

कामगिरी:- डॉ.रविंद्र शिसवे, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, पश्चिम परिमंडळ लोहमार्ग मुंबई. ज्ञानेश्वर गणोरे, सहायक पोलीस आयुक्त, वसई विभाग, लोहमार्ग मुंबई यांचे आदेशाप्रमाणे सचिन इंगवले वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पालघर रेल्वे पोलीस ठाणे, दामाजी हराळे यांचे • मार्गदर्शनाखाली पोहवा 2115 राहुल रा. भोईटे, पोहवा 337 डी. यु. शिंदे, पोहवा 1384 एम.डी.पाटील, पोना /2343 व्ही. व्ही. गोळे, पोशि 3434 जी.ए. कांबळे, पोशि 1479 अहिरे, पोशि/ 540 नागणे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट