रेल्वे प्रवासी महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिलेला ठाणे लोहमार्ग गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

ठाणे :- २ लाखांचे दागिने हस्तगत
६ गुन्ह्यांची उकल

रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने पळवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणे लोहमारग गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या कारवाईत २ लाख ३४ हजार ४७३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे गु.र.नं. १०१९/२०२४ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहितानुसार २ ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, फिर्यादी रोहीणी अशोक गायकवाड (वय २४ वर्षे, रा. दि. ऐरोली, नवी मुंबई) २ ऑगस्ट रोजी सकाळी ०८.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्टेशन फलाट क्र. ०६ बरील अप सीएसएमटी फास्ट लोकलच्या मधल्या महिलांच्या डब्यात गर्दीत चढताना कोणीतरी अज्ञात स्वो घोरटीने त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन नकळत काढून चोरी केलेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अशाच प्रकारचे महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीचे गुन्हे कुलां लोहमार्ग पोलीस ठाणे गु.र.नं. ७४०/२०२४ कलम ३९२ भा.दं.वि., गु.र.नं. ९२३/२०२४ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता आणि गु.र.न. ९४/२०२४ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता तसेच ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे गु.र.नं. ४२/२०२४ कलम ३७९ भा.दं.वि. तसेच १०५३/२०२४ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता प्रमाणे महिलां विरुद्धचे गुन्हे नोंद झाल्याने महिलांचे विरूद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांचा सखोल तपास करून गुन्हे उघडकिस आणण्याकरीता डॉ. श्री. रविंद्र शिसवे, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांनी गुन्हेशाखा, लोहमार्ग मुंबई यांना आदेशित केले होते. त्यानुसार गुन्हेशाखा, लोहमार्ग मुंबई चे ठाणे युनिट क्र. ०२ चे पथक गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते.

तपासा दरम्यान तपास पथकाने नमूद गुन्ह्यांतील फिर्यादीना प्रत्यक्ष भेटुन त्यांचेकडे आरोपीबाबत सखोल चौकशी केली तसेच ठाणे/भांडुप, घाटकोपर रेल्वे स्टेशन येथील सीसीटिव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता एक महिला आरोपी संशयितपणे बावरताना दिसुन आल्याने तपास पथकाने गुन्ह्याची कार्यपद्धती व वेळ यांचा सखोल अभ्यास करून गुन्हे घडणाऱ्या ठिकाणी सापळ्याचे आयोजन करून प्राप्त सीसीटिव्ही फुटेजमधील महिलेस ताब्यात घेऊन ठाणे युनिट क्र. ०२, गुन्हेशाखा, लोहमार्ग मुंबईचे कार्यालयात आणून तिचेकडे दाखल गुन्ह्यांचे अनुषंगाने तपास केला असता तिने लोकल प्रवासात महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने नकळत काढून चोरी केल्याची कबुली दिल्याने महिला आरोपी रोशनी साईराज मोरे, (वय २३ वर्षे, रा. ठि. कोपरखैराणे, नवी मुंबई) हिला अटक केली. सदर अटक महिला आरोपीने ६ गुन्ह्यांची कबुली दिली असुन मा. न्यायालयाकडून प्राप्त पोलीस कोठडी रिमांडचे मुदतीत या महिला आरोपीने ठाणे रे. पो. टाणे ४२/२०२४, १०१९/२०२४, १०५३/२०२४, कुर्ला रेल्वे व अन्य लोहमार्ग पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांची उकल झाली आहे.

सदरची कारवाई डॉ. रविंद्र शिसवे, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांचे आदेशाप्रमाणे श्री. मनोज पाटील, पोलीस उप- आयुक्त, मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई, श्री. राजेंद्र रानमाळे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, लोहमार्ग मुंबई यांचे मार्गदर्शन व सुचनांनुसार अरशुद्दीन शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हेशाखा, लोहमार्ग मुंबई आणि रोहीत सावंत, पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरीः अशोक होळकर, सहा. पो. उपनिरी/गजानन शेडगे, संदीप गायकवाड, मपोहवा सपना शिंदे, पद्मा केंजळे, पोहवा/सतिश धायगुडे, अनिल खाडे, अमित बडेकर, राजेश कोळसे, गणेश माने, इम्रान शेख, पोशि/हरिश संदानशिव व सुनिल मागाडे तसेच पोशि/अमोल अहिनवे व अनिल राठोड (तांत्रिक शाखा) यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट