वाहतूक नियमांसंदर्भात चालक मालक यांना मोलाचे मार्गदर्शन करताना रायगड जिल्हा पोलीस व जिल्हा वाहतूक शाखा आयोजित रस्ता सुरक्षा अभियान २०२४….

0
Spread the love

प्रतिनिधी-सचिन पवार

रायगड : माणगांव :- माणगांव :-रायगड जिल्हा पोलीस व जिल्हा वाहतूक शाखा आयोजित रस्ता सुरक्षा अभियान २०२४ दि.१४ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा असा मोलाचा संदेश माणगांव तालुका स्कूल बस युनियन चालक मालक यांना आज दि.८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या आदेशानुसार माणगांव वाहतूक शाखेचे उप पोलीस निरीक्षक संजय पवार, ए. एस. आय.कदम,वाहतूक पोलीस बांडे, शेरकर,शिंदे यांनी माणगांव तालुक्यातील स्कूल बस चालक मालक यांना रस्ता सुरक्षा जनजागृती व वाहतुकीचे नवीन नियम तसेच दंडाबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. वाहन चालविताना आपल्यामुळे दुसऱ्या वाहन चालकास तसेच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यांची काळजी घ्यावी, मुलांना चढ उतार व्यवस्थित करणे नेहमी वाहतुकी संदर्भात नियमाचे पालन करीत आपला प्रवास सुखकर करावा तसेच वाहन चालविताना मोबाईल वापर करू नये वाहन चालविताना सीटबेल्ट लावावा असा मोलाचा सल्ला माणगांव वाहतूक शाखेचे पोलीस उप निरीक्षक संजय पवार यांनी दिला.

यावेळी माणगांव स्कूल बस युनियन चे अध्यक्ष सचिन पवार, उपाध्यक्ष शबीर अखवारे, कार्याध्यक्ष एकनाथ पालकर, राजेश बुटे, पालांडे, विलास वाघमारे, रिहान मुकादम, नजीर करदेकर,मुबाशीर जिलानी, रंजीत बुटे,आफताब परदेशी, अंधेरे तसेच इतर ड्रायवर उपस्थित होते. माणगांव वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी वाहतुकीच सर्व नियम पाळत स्वतः ची व शालेय विद्याथ्याची काळजी घ्यावी वाहन चालविताना वाहतुकीच्या नवीन नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. कोणतेही व्यसन करून गाडी चालवू नये आपला वाहन धारक परवाना लायसन्स पियुसी पेपर आदी वाहन चालवताना लागणारी कागदपत्रे यांची खबरदारी घेत वाहन चालक व मालक यांनी आपल्या जवळ ठेवावे अशा प्रकारे माणगांव वाहतुक युनिट तर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती अंतर्गत कार्यक्रम घेऊन माणगांव स्कूल बस चालक मालक युनियन यांना मार्गदर्शन करून त्या विषयी सविस्तर माहिती दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट