खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात रायगड पोलीसाना मोठे यश…

उपसंपादक – रणजित मस्के
रायगड
दिनांक 7/8/2016 रोजी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत महाड पंढरपूर रस्त्याने बोरगाव ते चांडवे अशी समोद महादेव शेडगे हे त्यांची मोटरसायकलवर त्यांची पत्नी सह चालवित घेऊन जात असताना कोणीतरी अज्ञात वाहनाने मागून ठोकर दिली असा अपघात झाला असलेचे महाड एम.आय.डी.सी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 62/2016 भारतीय दंड विधान संहिता कलम 304 अ 279, 337 मोटार वाहन कायदा कलम 184, 134 प्रमाणे दाखल दाखल होता.
मयत याची आई सरिता महादेव शेडगे राहणार चांडवे तालुका महाड यांनी सदरचा अपघाताबाबत संशय व्यक्त करून माननीय अध्यक्ष राज्य मानवी हक्क आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे याचिका दाखल केली होती. सदर याचिकेतील निर्देशा प्रमाणे सदर गुन्ह्यात भारतीय दंड
संहिता कलम 302, 201 प्रमाणे कलम वाढवून सदर गुन्ह्याचा तपास अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल
झेंडे हे करीत आहेत.
सदर गुन्ह्याच्या तपासात सीडीआरची तांत्रिक विश्लेषण करून गुन्हा रजिस्टर झाल्यापासून सात वर्षांनी मयत सामोद महादेव शेडगे याचा मोबाईल गुन्ह्याचे कामी जप्त करण्यात आले आहे. तसेच साक्षीदारांकडे कौशल्यपूर्ण तपास करून सदर गुन्ह्याचा उकल करण्यात रायगड पोलिसांना यश आले असून त्यामध्ये संदीप नामदेव कळंबे राहणार भिवघर तालुका महाड यास अटक केली आहे.
गुन्ह्याचे वेळी वापरलेले वाहन होंडा मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपीने सदरचा गुन्हा अनैतिक संबंधातून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक संजय पाटील, वाचक शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के, स्था. गु.शाखा, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत फडतरे, महाड एम.आय.डी.सी पोलीस ठाणे पोलीस हवालदार संजय साळवी, अरुण घरत, पोलिस हवालदार, सागर अष्टमकर पोलीस शिपाई बंडगर, महिला पोलीस हवालदार अभियंती मोकल या पथकाने सात वर्षांपूर्वी घडलेले घटनेचा तपास चांगल्या पद्धतीने करून खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात पथकाला यश आले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com