रायगड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या..

उपसंपादक : राकेश देशमुख
अलिबाग :-रायगड पोलीस दलातील कर्मचारी राहुल कडू यांनी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. राहुल कडू याच्या आत्महत्येच कारण अद्याप समोर आलं नसलं तरी या घटनेने जिल्ह्यामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

साधं वागणं ,मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेला राहुल कडू 2008 साली रायगड पोलीस दलामध्ये भरती झाला होता. राहुल कडू सध्या रायगड जिल्ह्यातील पोलीस मुख्यालय असलेले अलिबाग येथे कार्यरत होता. जिल्ह्यातील सुधागड – पाली तालुक्यातील घोटवडे या आपल्या गावी गेला असताना त्यांनी तिथेच गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. राहुल कडू मागील काही दिवसांपासून वैद्यकीय रजेवर होता.
राहुल याने आत्महत्येचा निर्णय का घेतला असावा याची हुरहुर आता सर्वांनाच लागून राहिली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com