रायगड वहातूक पोलीसांतर्फे वाहन चालकांना वहातूक नियमांचे विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन…

प्रतिनिधी- फारुख देशमुख

महाड पोलादपूर रोड:- दिनांक 31.08.2023 रोजी 11:30 ते 12.00 वाच्या सुमारास नडगाव ता.महाड येथे पो स ई श्री पवार , ASI भिलारे, पोना/2358 पवार, पोशि/310 झेपले असे मा.श्री डॉ.रविंद्र सिंगल साहेब ,अप्पर पोलीस महासंचालक (वा) मुंबई, महाराष्ट्र राज्य, मा. पोलीस अधीक्षक मा. तानाजी चिखले उपअधीक्षक श्री घनश्याम पलंगे सो.रायगड परिक्षेत्र वाहतूक यांचे मार्गदर्शनाखाली उपस्थित वाहन चालक यांना वाहतूक नियमाचे पालन करणे बाबत मार्गदर्शन करून प्रबोधन व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
1) वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये.
2) वाहनाचे कागदपत्र सोबत ठेवणे.
3) दारू पिऊन वाहन चालू नये.
4) ट्रिपल सीट प्रवास करू नये.
5) मोटर सायकल चालविताना हेल्मेटचा वापर करावा.
6) वेग मर्यादाचे पालन करावे.
7) ओव्हरटेक करताना उजव्या बाजूने वाहन चालवावे.
8) चालक परवाना आवश्यक आहे.
9) मोटर वाहन कायद्याअंतर्गत वाढ झालेल्या दंडाच्या रकमेबाबत समजावून सांगितले
10) वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर टाळावा
11)वाहनांवर विशेषतः पाठी मागील बाजू रिफ्लेक्टर लावावे.
12) महामार्गावर धोकादायक परिस्थितीत कोणतेही वाहन थांबवू नये.
13)वाहन चालविताना वेग मर्यादाचे पालन करावे.
14)वाहन चालवताना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचना प्रमाणे वाहन चालवावे.
15) चारचाकी वाहन चालवताना चालक तसेच सर्वच प्रवाशांनी सीटबेल्ट वापरावे.
16) वाहन चालवताना समोरील वाहनाच्या वेगाचा अंदाज घेऊन वाहन चालवावे कारण समोरील वाहनाच्या वेगाचा अंदाज न आल्याने पाठी मागील वाहनाने समोरील वाहनस धडक दिल्याने घटणाऱ्या अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे.
17) ज्या वाहनांवर प्रलंबित दंड आहेत त्यांनी म.पो.केंद्राशी संपर्क साधून तात्काळ दंड भरून घ्यावेत. याबाबत मार्गदर्शन करुन मृत्युंजय दूत संकल्पनेची सविस्तर माहिती देण्यात आली.
18) मोटर सायकल स्वार तसेच जड वहान चालकांना वाहने चालविताना घेण्या बाबतची काळजी व खबरदारी तसेच स्वतःची व दुसऱ्याची हानी होणार नाही याबाबत सूचना दिल्या आहेत. अशी माहिती रविंद्र पवार
पोलीस उप निरीक्षक म.पो केंद्र महाड जि. रायगड यांनी दिली.



ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com