शिव प्रेमींसाठी रायगड किल्लाचा पायरी मार्ग सुरु…
उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:
मा. उपविभागीय अधिकारी साो महाड विभाग महाड यांजकडील दि. १६/८/२०२३ रोजीचा दुरध्वनी संदेशान्वये
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, अतिवृष्टीच्या कालावधीत दरड कोसळण्याच्या घटणा घडत असतात त्यामुळे, सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पावसाळा संपेपर्यंत रायगड किल्ला पायरी मार्ग बंद करणेबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
परंतु सद्ययास्थितीमध्ये महाड तालुक्यात पर्जण्याचे प्रमाण कमी आहे, तसेच अतिवृष्टीबाबत कोणताही ईशारा आय. एम. डी. ए. मार्फत देण्यात आलेला नाही. किल्ले रायगडावर जाणारे शिवभक्त यांचे प्रमाण अधिक असून पायमार्ग बंद असलेमुळे किल्ले रायगडावर जाण्यासाठी रोपवे हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. किल्ले रायगडावर जाणारे शिवभक्त,पर्यटक,खाजगी सुरक्षारक्षक यांचेकडून सदर पायवाट पूर्ववत सुरु करणेबाबत वारंवार मागणी होत आहे.
सबब अतिवृष्टीबाबत कोणताही इशारा आय. एम. डी. ए. मार्फत देण्यात आलेल नाही. त्यामुळे किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग पूर्ववत तात्काळ सुरु करण्यात यावा असे आदेश आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com
