“वैजापूर येथे कुंटणखान्यावर छापा कारवाई. “

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

वैजापूर आज मा.पोलीस अधीक्षक श्री.मनीष कलवानिया, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.सुनिल लांजेवर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी 16.00 वाजेच्या सुमारास सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांना गोपनिय माहिती मिळाली की, खान गल्ली वैजापुर येथे काही महिला वेश्यव्यवसाय करत आहेत. त्यावरुन महक स्वामी यांनी मिळालेल्या माहितीची खात्री करणेकामी व छापा कारवाई करणेकामी पोलीस पथक तयार केले. तत्पुर्वी पंच व एक डमी ग्राहकास पैसे देऊन त्याठिकाणी खरच व्यश्याव्यवसाय चालतो का याबाबत खात्री करुन ईशाऱ्याने कळविणे बाबत सांगीतले.

तोपर्यंत महक स्वामी यांनी वैजापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संजय लोहकरे व त्यांचे सोबतचे पोलीस अंमलदार असे बोलावून घेऊन सापळा रचला व डमी ग्राहकाकडून ईशारा मिळताच अचानक मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी खान गल्ली वैजापूर येथे चालू असलेल्या कुंटन खाण्यावर छापा मारला. त्यात पाच महिला वेश्याव्यवसाय करतांना मिळून आल्या. तर वेश्यगमण करण्याकरिता आलेले तीन ग्राहक (पुरुष ) या छापा कारवाईमध्ये ताब्यात घेण्यात आले आहेत. छापा कारवाई मध्ये सदर ठिकाणहून 36,000/- रुपये किमतीचे 10 मोबाईल हँडसेट, 81,763 रुपये रोख रक्कम, 2000/- रुपये किमतीचे ईतर साहित्य व दहा निरोधचे बॉक्स असा एकूण 1,19,763/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळून आलेल्या महिलांकडे विचारपूस केली असता त्या मध्यस्थी तीन महिला यांच्या सांगण्यावरुन खान गल्ली येथे असलेल्या खोल्यांमध्ये वेश्याव्यवसाय करत असल्याचे सांगीतले. त्या बदल्यात सदर महिला या वेश्यगमणातून मिळालेल्या पैशांपैकी अर्धे पैसे वर नमूद अरोपिताना देत असल्याचे देखील त्यांनी सांगीतले. त्यावरुन पोलीस स्टेशन वैजापुर येथे स्त्री व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम ( पिटा ॲक्ट ) 1956 या कायद्याच्या विविध कलमांतर्गत मध्यस्थी तीन महिला यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास वैजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संजय लोहकरे हे करत आहेत.
सदरची छापा कारवाई सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी, उपविभाग वैजापुर ,पोलीस निरीक्षक श्री.संजय लोहकरे, पोउपनि श्री. श्रीराम काळे, पोलीस अंमलदार- मोईस बेग, ज्ञानेश्वर शिंदे, अजय गोलवाल, योगेश कदम, गोपाल जोनवाल, दिनेश गायकवाड, प्रशांत गिते, विजय भोटकर, पंकज गाभूड, गणेश पैठणकर, नवनाथ निकम महिला पोलीस अंमलदार वर्षा गाडेकर आदी… यांच्या पथकाने केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट