रबाळे ,कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीत रात्री घरफोडी करणाऱ्या आरोपीकडून 20 गुन्ह्यांची उघड- एकुण 28 लाखाचा माल जप्त…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

नवी मुंबई: गुरूवार दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी पोलीस आयुक्तालय नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष -1 कडून मिळालेल्या माहितीनुसार
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात रबाळे, कोपरखैरणे पोलीस ठाणे हददीत रात्रौ घरफोडी चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा,कक्ष-१ कडून अटक. आरोपीकडून रात्रौ घरफोडी चोरीचे एकुण २० गुन्हे उघड, एकुण २८,३२,८००/-रू (अठठावीस लाख
बत्तीस हजार आठशे) किमतीचे ६०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात रबाळे पोलीस ठाणे हददीत सेक्टर ०३,ऐरोली,नवी मुंबई येथील एका घरामध्ये दिनांक २६/०८/२०२२ रोजी रात्रीचे दरम्यान अज्ञात चोरटयांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून, आतमध्ये प्रवेश करून १०,८५,०००/- रू.एकुण कींमतीचे ४३.४ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने घरफोडी चोरी करून नेले होते.

सदरबाबत रबाळे पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४२३/२०२२ भादवि कलम ४५४,४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात घरफोडी चोरीचे प्रमाण वाढल्याने आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत मा. पोलीस आयुक्त श्री.बिपीनकुमार सिंह सो, मा. पोलीस सह आयुक्त, डॉ. श्री जय जाधव साो, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. महेश घुर्ये सो, यांनी तपासा संबंधी मार्गदर्शक सूचना दिल्या.

मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री सुरेश मेंगडे, मा.सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. विनायक वस्त, नवी मुंबई यांनी गुन्हयाचे घटनास्थळास भेट देवुन घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावा, तांत्रिक पुरावा व गुन्हयातील आरोपी येण्याचे व जाण्याचे मार्ग इत्यादी बाबत गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणावा याकरीता मार्गदर्शक सुचना देवुन तपास नियमावली तयार करुन दिल्याने,गुन्हे शाखा,कक्ष-१ चे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा समांतर तपास सुरू केला.

गुन्हे शाखा,कक्ष-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनिल शिंदे, सपोनि. आर.एम.तडवी, सपोनि हर्षल कदम तसेच पोहवा/१५५७ चव्हाण, पोना/२६८३ जगदाळे, पोना/२०४९ मोरे, पोना/२८८३ किंद्रे, पोना/२७६३ सानप, पोशि/४४४४ आशिष जाधव, पोशि/३८४३ सावरकर, पोशि/४४४६ ठाकूर, एएसआय/ प्रदीप लिंगाळे व पोशि/२३९४ राकेश भोईर यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित इसम आढळून आला.

यापूर्वी वर नमूद पथकाने रबाळे पो. ठाणे गु.र.नं. २३३/२०२२ दिनांक १०/०५/२०२२ तसेच गु. र.नं. ३४३/२०२२ दिनांक ०९/०७/२०२२ या घरफोडी गुन्हयाचा समांतर तपास शासकिय व खाजगी उपलब्ध असणा-या सीसीटीव्ही फुटेज, दोन्ही घटनास्थळाचे परिसरातील उपलब्ध माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून, सतत ५ ते ६ दिवस तपास करून, नमूद आरोपी यानेच सदरचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न केले होते.

त्यानंतर पुन्हा सदर आरोपीचा सतत ६ ते ७ दिवस सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आधारे तपास करून गुन्हयातील आरोपीचे ठावठिकाणे/संपर्क क्रमांक प्राप्त करून आरोपी हा कळवा, ठाणे येथे राहत असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर नमूद पथकाने कळवा ब्रिज, ठाणे परिसरात जावुन सापळा रचून गुन्हयातील आरोपीस शिताफीने ताब्यात घेवून त्यास दिनांक ०७/०९/२०२२ रोजी अटक केली.

अटक आरोपीताची मा. न्यायालयाकडुन १० दिवस पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करुन आरोपीकडे सखोल तपास करुन आरोपीकडून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील रबाळे पो. ठाणे व कोपरखैरणे पो. ठाणे हददीतील सन २०२२ मधील १२ गुन्हे व सन २०२१ मधील ०८ गुन्हे असे एकुण २० रात्रौ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून एकुण २८,३२,८००/-रू (अठठावीस लाख बत्तीस हजार आठशे ) किमंतीचे ६०२ ग्रॉम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे.

रबाळे पो. ठाणे हददीतील उघडकीस आणलेले गुन्हे – एकुण १६

१) रबाळे पो. ठाणे गु.र.नं. ४२३/२०२२ भा.द.वि. कलम ४५४,४५७, ३८०
२) रबाळे पो. ठाणे गु.र.नं. १३२/२०२२ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०
३) रबाळे पो. ठाणे गु.र.नं.३४/२०२२ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०
४) रबाळे पो. ठाणे गु.र.नं. ३४३/२०२२ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०
५) रबाळे पो. ठाणे गु.र.नं. २३३/२०२२ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०
६) रबाळे पो. ठाणे गु.र.नं.३४०/२०२२ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०
७) रबाळे पो. ठाणे गु.र.नं. ३८७/२०२२ भा.द.वि. कलम ४५७,३८०
८) रबाळे पो. ठाणे गु.र.नं.२०२/२०२२ भा.द.वि. कलम ४५७,३८०
९) रबाळे पो. ठाणे गु.र.नं. २८५/२०२१ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०
१०) रबाळे पो. ठाणे गु.र.नं. ११७/२०२१भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०
११) रबाळे पो. ठाणे गु.र.नं.५६/२०२१ भा.द.वि. कलम ४५७,३८०
१२) रबाळे पो. ठाणे गु.र.नं. १२१/२०२१ भा.द.वि. कलम ४५७,३८०
१३) रबाळे पो. ठाणे गु.र.नं. १०५/२०२१ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०
१४) रबाळे पो. ठाणे गु.र.नं. १००/२०२१ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०
१५) रबाळे पो. ठाणे गु.र.नं. २९१/२०२१ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०
१६) रबाळे पो. ठाणे गु.र.नं.८५/२०२१ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८०

कोपरखैरणे पो. ठाणे हददीतील उघडकीस आणलेले गुन्हे – एकुण ०४

१७) कोपरखैरणे पो. ठाणे गु.र.नं. १७/२०२२ भा.द.वि. कलम ४५७,३८०
१८) कोपरखैरणे पो. ठाणे गु.र.नं. ३०४/२०२२ भा.द.वि. कलम ४५७,३८०
१९) कोपरखैरणे पो. ठाणे गु.र.नं. २२१/२०२२ भा.द.वि. कलम ४५७,३८०
२०) कोपरखैरणे पो. ठाणे गु.र.नं. ३५८/२०२२ भा.द.वि. कलम ४५७,३८०

हस्तगत मालमत्ता:
१)२८,३२,८००/-रू किमंतीचे ६०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जु.वा.कि.सु.
२)१५,०००/-रू कि.चे आरोपीचे ताब्यात मिळून आलेले ०३ महागडे मोबाईल
३) १०००/-रू कि. चा एक दागिने मोजण्याचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा

अटक आरोपीचे नाव :

१) संतोष अंबक घनघाव वय ४५ वर्षे रा. खोली नं. ३७, राकेश गुप्ता याचे किराणा दुकानाजवळ, आण्णा भाऊ साठे नगर, कळवा ब्रिज खाली, कळवा, ठाणे

अटक आरोपी ची गुन्हेगारी पार्श्वभूमी

१) पनवेल तालुका पो. ठाणे गु.र.नं. २४८/२०१६ भादवि कलम ४५४,४५७,३८०
२) कळंबोली पो. ठाणे गु.र.नं. १४०/२०१७ भादवि कलम ४५४,४५७,३८०
३) तळोजा पो. ठाणे गु.र.नं. २२२/२०१७ भादवि कलम ४५४,४५७,३८०
४) खांदेश्वर पो. ठाणे गु.र.नं.२१९/२०१५ भादवि कलम ४५४,४५७,३८०
५)रबाळे पो. ठाणे गु.र.नं. २१६/२०१७भादवि कलम ४५४,४५७.३८०
६) रबाळे पो. ठाणे गु.र.नं. ३७०/२०१८ भादवि कलम ४५४,४५७,३८०
७) रबाळ पो. ठाणे गु.र.नं. २३३/२०१३ भादवि कलम ४५४,४५७,३८०
८) कळंबोली पो. ठाणे गु.र.नं. ०४/२०१६ भादवि कलम ४५४,४५७,३८०
९) कोपरखैरणे पो. ठाणे गु.र.नं.३८/२०१६ भादवि कलम ४५४,४५७,३८०
१०) रबाळे पो. ठाणे गु.र.नं. १६७/२०१८ भादवि कलम ४५४,४५७,३८०
११) कोपरखैरणे पो. ठाणे गु.र.नं. २०/२०१४ भादवि कलम ४५४,४५७,३८०
१२) रबाळे पो. ठाणे गु.र.नं. १७६/२०१३ भादवि कलम ४५४,४५७,३८०
१३) रबाळे पो. ठाणे गु.र.नं. २६५/२०१६ भादवि कलम ४५४,४५७.३८०
१४) रबाळे पो. ठाणे गु.र.नं. १७२/२०१३ भादवि कलम ३७९

सदरची कारवाई मध्ये गुन्हे शाखा,कक्ष-१चे

१)वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल शिंदे, २) सहा. पोलीस निरीक्षक आर.एम.तडवी ३) सहा. पोलीस निरीक्षक हर्षल कदम ४) पोहवा/१०३१ रोहिदास पाटील, ५) पोहवा/९८० विश्वास पवार ६) पोहवा/१५५७ बालाजी चव्हाण, ७) पोना/२८८३ निलेश किंद्र, ८) पोना/२६८३ शशीकांत जगदाळे, ९) पोना/२९९९ धनाजी भांगरे १०) पोना/२१८९ अजय वाघ, ११) पोना/२०४९ दिपक मोरे १२) पोना/२७६३ रविंद्र सानप १३) पोकॉ/३८४३ विशाल सावरकर, १४) पोकॉ/३०७७ उत्तरेश्वर जाधव १५) पोकॉ/४४४४ आशिष जाधव १६) पोकॉ/४४४६ अश्विन ठाकूर १७) चालक/सहा. पो.उप.निरीक्षक प्रदीप लिंगाळे, १८) चालक/पो.शि./२३९४ राकेश भोईर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.co

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट