पुसेगाव पोलीस ठाणे यांची नवरात्र व ग्रामपंचायत निवडणूक काळात धडक कारवाई , एक गावठी कटटा व तलवार जप्त…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :

श्री. समीर शेख, मा. पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल सो, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो सातारा यांनी बेकायदा, बिगरपरवाना स्वतःचे जवळ पिस्टल सारखी शस्त्रे बाळगणारे इसमांची माहीती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना आशिष कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पुसेगाव पोलीस ठाणे यांना दिलेल्या होत्या. त्याअनुशंगाने पुसेगाव पोलीस ठाणेचे एक पथक तयार करून त्यांना अवैध शस्त्रांबाबत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले होते.

दिनांक २०.१०.२०२३ रोजी आशिष कांबळे, स.पो.नि. पुसेगाव पोलीस ठाणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, मौजे रामोशीवाडी पो. जाखणगाव ता. खटाव येथील टेकवस्तीवर राहणारा इसम नामे अंकुश गणपत मदने हा त्याचे जवळ गावठी पिस्टल व तलवार घेवून गावात वावरत आहे अशी माहीती मिळालेने पुसेगाव पोलीस ठाणेकडील एक तपासपथक तयार करून मौजे रामोशीवाडी, टेकवस्ती येथे नमूद इसमाचा शोध घेवून त्याचे हालचालींवर बारकाईने पाळत ठेवून त्याची पूर्णपणे गोपनीयरित्या चौकशी करून दिनांक २०.१०.२०२३ रोजी रात्री १९.४५ वाजणेचे सुमारास त्यास ताब्यात घेवून त्याचेकडून सखोल चौकशी करून त्याचे ताब्यातून एक गावठी कट्टा व तलवार अशी शस्त्रे तपासपथकातील धनंजय शिंदे सहा. पोलीस उपनिरीक्षक यांनी दोन पंचासमक्ष पंचनामा करून ताब्यात घेतली आहेत. त्याबाबत पुसेगाव पोलीस ठाणे येथे दिनांक २५.१०.२०२३ रोजी ००:२५ वाजता भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३.४.२५ प्रमाणे पोलीस हवालदार श्रीनिवास सानप यांनी फिर्याद दाखल दिली आहे. सदर अपराधाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री एस. बी. येवले सो हे करीत आहेत.

श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा, श्री राजेंद्र शेळके, उपविभागिय पोलीस अधिकारी, कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. आशिष कांबळे, सहा. पोलीस उपनिरीक्षक धनंजय शिंदे, सुभाष शिंदे, पोलीस हवालदार श्रीनिवास सानप, पोलीस नाईक सुनिल अबदागिरे, प्रमोद कदम पोलीस कॉन्स्टेबल अविनाश घाडगे यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक व श्रीमती आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

मा. पोलीस अधीक्षक सातारा यांनी पदभार स्वीकारलेपासून नोव्हेंबर २०२२ ते आजपर्यंत अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी जिल्हयात एकूण २८ गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये ५३ पिस्टल / रिव्हॉल्वर व ५१ काडतुसे जप्त करण्यात आली असून ८३ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. अत्यंत कमी कालावधीत आत्तापर्यंतची ही रेकॉर्डब्रेक कामगिरी असून अशाच प्रकारची ठोस कारवाई जिल्हयात चालू ठेवणार असलेचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट