पर्वती पोलीसांकडून पुण्यातील सराईत गुन्हेगार पिस्तुलासह ताब्यात…

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :
बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पर्वती पोलीस ठाण्यातील तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीकडून देशी पिस्टल व एक काडतूस असा एकूण 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.13) लक्ष्मीनगर (Laxmi Nagar Parvati Pune) येथे करण्यात आली. साहिल हनिफ पटेल Sahil Hanif Patel (वय-21 रा. आंबेडकर वसाहत, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पर्वती पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी हद्दीमध्ये पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार कुंदन शिंदे व परुषोत्तम गुन्ला यांना माहिती मिळाली की, पर्वती पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार साहिल पटेल याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल असून तो लक्ष्मीनगर येथील सार्वजनिक शौचालयाच्या बोळीत संशयास्पदरित्या थांबला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता देशी बनावटीचे पिस्टल आणि एक काडतूस पोलिसांना मिळाले. पोलिसांनी 35 हजार 700 रुपयांचे पिस्टल आणि काडतुस जप्त केले आहे. त्याच्यावर पर्वती पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट आणि मुंबई पोलीस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हे दाखल आहेत. आरोपीवर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, धारदार शस्त्र बाळगणे, जबरी चोरी, चोरी, दंगा असे गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याने हे पिस्टल कशासाठी व कोणाकडुन घेतले. तसेच याचा वापर यापूर्वी केला आहे का, त्याचे इतर कोण साथीदार आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील (IPS Pravinkumar Patil),पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 सुहैल शर्मा (IPS Suhail Sharma), सहायक पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे (ACP Appasaheb Shewale), वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे (Sr.PI Jayram Paigude), पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे (PI Vijay Khomne) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे (PSI Chandrakant Kamthe) पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे, दयानंद तेलंगे, प्रकाश मरगजे, नवनाथ भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, किशोर वळे, अनिस तांबोळी, अमोल दबडे, प्रशांत शिंदे, अमित चिव्हे, प्रमोद भोसले, सद्दाम शेख, ज्ञानेश्वर चिंदे यांच्या पथकाने केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com