पुण्यात कर्जदाराच्या कुटुंबावर वाईट नजर ठेवणाऱ्या खासगी सावकारांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : फरासखाना पोलीस ठाणे हद्दीतील ,सोलापूर बाझार येथे एक असे प्रकरण पुढे आले असून यामध्ये एका व्यवसायिकाला व्यवसायासाठी वेळोवेळी २० ते २२ लाख रुपये दिल्यानंतर १ कोटी वसूल केले. मात्र खासगी सावकाराचे पोट काही भरले नाही म्हणून त्यानी कर्जदाराच्या कुटुंबावर डोळा ठेवत त्याने परतफेडीनंतरही कर्जदाराच्या पत्नी व मुलीला धंद्याला लावण्याची धमकी दिली. फरासखाना पोलिसांनी या सावकाराला लगाम घातला आहे.
फरासखाना पोलिसांनी मंगळवार पेठेतील राजेंद्र देवेंद्र, राजेश राजेंद्र व राजू उर्फ जॉन राजेंद्र देवेंद्र अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनी ३९ वर्षीय व्यवसायिकास पैसे दिले होते. राजेंद्र कुटुंबियांकडे खासगी सावकारीचा कोणताही परवाना नसताना त्यांनी सावकारी केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर सावकारी प्रतिबंधक कायद्याखालचा व फसवणुकीचाही गुन्हा दाखल केला आहे.
या युवक व्यावसायिकास वरील तिघांनी वेळोवेळी २० लाख रुपये व्यवसायासाठी दिले. व्यवसायातून येणाऱ्या पैशातून संबंधित कर्जदाराने या तिघांना १ कोटीपर्यंतची रक्कम परत दिली, तरीही आमची रक्कम बाकी राहते म्हणून त्या कर्जदारास हे तिघे शिवीगाळ करायचे व धमकी द्यायचे. पैसे दिले नाही, तर बायको व मुलीला धंद्याला लावू अशी धमकी या तिघांनी दिल्यानंतर नाईलाजाने या युवक व्यवसायिक कर्जदाराने फरासखाना पोलिस ठाण्यात या खासगी सावकारांवर तक्रार दाखल केली असून पुढील तपास फरासखाना पोलिस करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com